MP Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे मजतमोजणी सुरू आहे. NDA आघाडीला बहुमताचा आकडा पार करण्यात आतापर्यंत यश आले आहे, तर INDIA आघाडीची कामगिरीही चांगली होताना दिसत आहे. आतापर्यंत एनडीए २०९-३०० जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी २२५ जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. पण येथे नोटा'ला (NOTA) अश्चर्यचकित करणारे मतं मिळाली आहेत. इंदुरमध्ये नोटाने सर्व रेकॉर्ड तोडले मोडले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत NOTA ला १२७२७७ मतं मिळाली होती. यासोबतच NOTA साठी मतांची संख्या वाढत आहे. इंदूर यावेळी या बाबतीत विक्रम करू शकतो.
विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाकडून एकही उमेदवार उभा करता आला नाही. यानंतर काँग्रेसने इंदूरच्या जनतेला NOTA ला मतदान करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंतच्या मतमोजणीवरून इंदूरच्या जनतेने काँग्रेसचे ऐकल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंदूरमधून भाजपचे उमेदवार शंकर लालवानी ७ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांना ७४१५८६ मते मिळाली होती. तर बसपाचे उमेदवार संजय सोळंकी यांना ३२३१२ मते मिळाली आहेत. इंदूरमध्ये तिकीट मिळाल्यानंतर अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस इंदूरच्या निवडणुकीतून बाहेर पडली.
त्यानंतर काँग्रेसकडून NOTA ला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी इंदूरच्या ८ वेळा खासदार आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची नाराजीही दिसून आली.