मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indore Mishap: मृत्यूवर विजय मिळवून आली होती महिला; मात्र दोरी तुटली अन्.., घटनेचा भयंकर VIDEO VIRAL

Indore Mishap: मृत्यूवर विजय मिळवून आली होती महिला; मात्र दोरी तुटली अन्.., घटनेचा भयंकर VIDEO VIRAL

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 31, 2023 10:31 PM IST

Indore Temple Tragedy : इंदूरमध्ये रामनवमी दिवशी झालेल्या दुर्घटनेचा एक भयंकर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विहिरीत पडलेली महिला मृत्यूवर विजय मिळवून जवळपास सुखरुप वरती आली होती, मात्रअचानकदोरी तुटली.

VIDEO VIRAL
VIDEO VIRAL

मध्य प्रदेश राज्यातील इंदूरमध्ये रामनवमी दिवशी झालेल्या दुर्घटनेचा एक भयंकर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विहिरीत पडलेली महिला मृत्यूवर विजय मिळवून जवळपास सुखरुप वरती आली होती, मात्र अचानक दोरी तुटली. ही दोरी म्हणजे महिलेच्या आयुष्याचीच दोरी होती. दोरी तुटताच आधीच बेशुद्ध दिसत असलेली महिला जवळपास २० ते ३० फुटावरून पुन्हा विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढताना पथकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

याघटनने देशातील नंबर वन शहर आणि स्मार्ट सिटीची पोलखोल झाली आहे. गुरुवार हा अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी मिळेल त्या साधनांनी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस वफायर ब्रिगेडपथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र ना पोलीस आणि अग्निशामक दलाकडे दोरी होती. त्यानंतर महापालिकेने कशातरी दोऱ्या मिळवल्या. विहिरीत मृत्यूशी झुंजणाऱ्या लोकांना दोऱ्या पाहून जीवात जीव आला. बेशुद्ध पडलेल्या महिला व मुलांना दोरीने बांधून वरती काढले जात होते. मात्र यावेळी एक दोरी तुटली. ही दोरी अशा वेळी तुटली जेव्हा महिला जमिनीपासून केवळ ३ फूट दूर होती. महिला ४० फूट उंचीवरून पुन्हा महिला विहिरीत कोसळली.

 

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ति महिलेला दोरीला बांधून तिला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मध्येच दोरी तुटते व महिलेची किंकाळी ऐकू येते तसेच ती पुन्हा विहिरीत पडते. स्थानिक लोकांनी तक्रार केली की, प्रशासनाला दुर्घटनेच्या गंभीरतेचा अंदाजच आला नाही. प्रशासनाने खूप उशीर झाल्यानंतर मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण केले.

इंदूरच्या पटेल नगर येथील मंदिरात घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत ३६ भाविकांनी आपला जीव गमावला आहे. जवळपास २४ तास चाललेल्या बचाव मोहिमेत ३६ वा मृतदेह काढला गेला. शेवटचा काढलेला मृतदेह सुनील सोलंकी (५२)यांचा होता. ही दुर्घटना शहरात्या इतिहासातील आतापर्यंतची मोठी दुर्घटना आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग