मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indigo flight : चार तास लेट होती इंडिगो फ्लाइट, पण प्रवासी होता खूपच खुश; अखेर प्रकार काय?

Indigo flight : चार तास लेट होती इंडिगो फ्लाइट, पण प्रवासी होता खूपच खुश; अखेर प्रकार काय?

Jun 23, 2024 12:21 AM IST

Indigo Flight : एका प्रवाशाने फ्लाइट चार तास लेट होती तरी एअरलाइन्सचे आभार मानले आहेत. अखेर काय होता हा प्रकार, जाणून घेऊयात..

 चार तास लेट होती इंडिगो फ्लाइट, पण प्रवासी होता खूपच खुश
 चार तास लेट होती इंडिगो फ्लाइट, पण प्रवासी होता खूपच खुश

Indigo flight : अशा अनेक घटना समोर येतात की, जर विमानाचे उड्डाण काही मिनिटे जरी विलंबाने असेल तर प्रवाशांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मात्र एका प्रवाशाने फ्लाइट चार तास लेट होती तरी एअरलाइन्सचे आभार मानले आहेत. नुकतेच दिल्लीहून लेह ला जाणारे इंडिगोच्या विमानाला उड्डाण करण्यात विलंब झाला. मात्र फ्लाइटमधील एक प्रवासी रागाला येण्याऐवजी खूपच खुश दिसत होता. अखेर असे काय झाले की हा प्रवासी खुश होता, जाणून घेऊयात..

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार दिल्लीहून लेहकडून उड्डाण करणाऱ्या इंडिगो फ्लाइटने चार तास विलंबाने उड्डाण केले. यावेळी सर्व प्रवासी विमानात बसून राहिले. कंपनीने प्रवाशांच्या सुविधेसाठी एसी चालू ठेवला. त्याचबरोबर त्यांना नाश्ता आणि पाणीही दिले. एअरलाइनच्या सेवेने खुश झालेल्या प्रवाशाने रेडिट वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रवाशाने लिहिले की, एसी चालु ठेवण्यासाठी इंडिगोचे कौतुक करावे लागेल. केबिन क्रू मेंबर्संनी प्रवाशांना सतत पाणी पाजले. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला एक छोटेसे स्नॅक पॅकेटही दिले.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कारण भूतकाळात इंडिगोच्या सेवेने निराश झालेले अनेक इंटरनेट यूजर्संनी आपले अनुभव व्यक्त करताना दिसले. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, जेव्हा मी माझी पहिलीच नोकरी ज्वाईन करणार होता. तेव्हा त्यांनी माझी फ्लाइट रद्द केली व मला भीक मागण्यासाठी मजबूर केले.  त्याचवेळी मी ठरवले की, मी भविष्यात पुन्हा कधीही इंडिगो विमानातून प्रवास करणार नाही.

अन्य एका यूजरने लिहिले की, आधी खराब सेवा दिल्यानंतर त्याची भरपाई अशा प्रकारे आदरातिथ्य करून केली जात आहे. दरम्यान अन्य सोशल मीडिया यूजर्संनी फ्लाइट उड्डाणास विलंब झाल्याने दरम्यानच्या काळात प्रवाशांची काळजी घेतल्याबद्दल एअरलाइनचे कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले की, मी नेहमी एअरलाइनच्या स्वच्छता आणि सफाईचे कौतुक करत असतो. हे नेहमी चांगले मेन्टेंन असते. दरम्यान आता ते प्रवाशांचे स्वागत त्यापद्धतीने करत नाहीत, जसे काही वर्षापूर्वी करत होते. आणखी एका यूजरने म्हटले की, इंडिगोवर प्रेम आहे, ही एअरलाईन दुसऱ्यापेक्षा चांगली आहे.

WhatsApp channel
विभाग