मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  delhi airport news : गो इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्बची अफवा; प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या; Video Viral

delhi airport news : गो इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्बची अफवा; प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या; Video Viral

May 28, 2024 10:09 AM IST

Delhi airport Bomb threat : दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच या विमानातून प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील पुढे आला आहे.

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

Delhi airport Bomb threat : दिल्ली विमानतळावर विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती समजल्यावर विमानतळावर तणावाचे आणि दहशतीचे वातावरण होते. दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. विमानात त्यावर 'बॉम्ब' लिहिलेला टिश्यू पेपर सापडला. मंगळवारी पहाटे ५.३५ वाजता बॉम्बच्या धमकीमुळे विमानतळावर घबराट पसरली होती. प्रवाशांना तातडीने विमानाच्या आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये प्रवास आपत्कालीन गेटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. काही प्रवाशांनी तर विमानाच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या.  बॉम्ब शोधक पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

टिश्यू पेपरवर लिहिले होते 'बॉम्ब'

सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली विमानतळावरील इंडिगो फ्लाइट 6E2211 च्या टॉयलेटमध्ये 'बॉम्ब' शब्द लिहिलेला टिश्यू पेपर सापडला आहे. ही माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली. यंत्रणांनी केलेल्या तपासणीनंतर ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Palghar Accident : पालघरमध्ये टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात! तिघे ठार ७ गंभीर जखमी! नाशिकच्या भावीकांवर काळाचा घाला

सर्व प्रवासी सुरक्षित

विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर उड्डाण 'आयसोलेशन बे' मध्ये नेण्यात आले. दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले की, आज पहाटे ५.३५ वाजता दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. यानंतर क्यूआरटी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सर्व प्रवाशांना इमर्जन्सी गेटमधून बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

इंडिगोने सादर केले निवेदन

या संपूर्ण प्रकरणावर इंडिगोनेही निवेदन दिले आहे. एअरलाइन कंपनीने सांगितले की, दिल्लीहून वाराणसीला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E2211 दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाली होती. सर्व आवश्यक प्रोटोकॉल पाळले गेले. विमानतळ सुरक्षा यंत्रणांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे विमान 'आयसोलेशन बे'मध्ये नेण्यात आले. सर्व प्रवाशांना आपत्कालीन गेटमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या विमानाची तपासणी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत तैनात केले जाईल.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग