अमेरिकेतील पेनसिल्वेनिया राज्यात एका कार अपघातात २४ वर्षीय भारतीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील भारताचे वाणिज्य दूतावासाने शनिवार ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. दूतावासाने तरुणीच्या कुटूंबाप्रती संवेदना व्यक्त करत म्हटले की, २१ मार्च रोजी पेनसिल्वेनियामध्ये एका कार अपघातात अर्शिया जोशीचा मृत्यू झाला. जोशीने गेल्या वर्षी पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. वाणिज्य दूतावासाने म्हटले की, जोशीचे कुटूंब व स्थानिक नेत्यांच्या संपर्कात आहोत.
वाणिज्य दूतावासाने मृत तरुणीच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, जोशी यांचा मृतदेह लवकरच भारतात पाठवला जाईल. ‘टीम एड’ संस्था जोशीचा मृतदेह कुटूंबाकडे दिल्लीला पाठवण्यासाठी मदत करत आहे. टीम एड संघटना विशेष करून अशा भारतीय समुदायातील लोकांची मदत करते जे परदेश प्रवास करत आहेत किंवा परदेशात राहतात. संघटना अशा लोकांना मदत करते जे अपघातग्रस्त, आत्महत्या, हत्या किंवा जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू अशा गंभीर परिस्थितींचा सामना करतात.
टीम एडचे संस्थापक मोहन नन्नापनेनी यांनी सांगितले की, दु:खद घटनांबाबत आम्हाला दु:ख आहे. त्यांनी म्हटले की, मागच्या आठवड्यात टीम एडने पाच लोकांचे मृतदेह भारतात पाठवले आहेत. नन्नापनेनी आणि त्यांची टीम सध्या अमेरिका आणि कॅनडात मारलेल्या गेलेल्या अनेक लोकांचे मृतदेह भारतात पाठवण्यासाठी कुटूंबीयांची मदत करत आहे. नन्नापनेनी यांनी म्हटले की, त्यांची टीम विद्यार्थी व कामगारांसह भारतीय प्रवाशांचे मार्गदर्शन आणि आवश्यक सहायता प्रदान करते.
संबंधित बातम्या