Viral News: भारतात वर्षाला १० ते १५ लाख रुपये पगार मिळवण्यासाठी तरुण- तरुणी धडपड करत असतात. मात्र, कॅनडात नोकरी करणारी एक तरुणी ६० लाख पगार असूनही खूश नाही. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तरुणीला ६० पगारही कमी का वाटतोय, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर, काही जण या तरुणीला महागडे छंद असू शकतात, त्यामुळे तिला पगार कमी वाटतो, असे बोलत आहेत. मात्र, संबंधित तरुणीने त्यामागचे कारण सांगितले आहे.
संबंधित तरुणी भारतीय असून मुलगी कॅनडामध्ये टीडी बँकेत तंत्रज्ञ म्हणून काम करत असून तिला वार्षिक ६० लाख पगार आहे. मात्र, पण हा पगारही कॅनडामध्ये राहण्यासाठी पुरेसा नाही, असे तरुणीने म्हटले आहे. तरुणीला १० वर्षांचा अनुभव आहे. तरुणीचा हा व्हिडिओ पियुष मोंगा नावाच्या व्यक्तीने @salaryscale नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तरुणी पियुषला सांगते की ती, वार्षिक ९५००० डॉलर्स म्हणजे सुमारे ६० लाख रुपये कमवते. पण तरही ही तरुणी खूश नाही. त्यामागचे कारणही तरुणीने सांगितले आहे. भारताच्या तुलनेत कॅनडात महागाई खूप जास्त आहे. कॅनडात बटर खरेदी करण्यासाठी आठ डॉलर्स खर्च करावे लागतात. इथे राहण्यासाठी खूप पैसा लागतो.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती कॅनडातील टोरंटो येथे राहते. तिच्या दोन बेडरूम आणि दोन बाथरूमच्या घरात राहण्यासाठी दरमहा १६०० डॉलर्स म्हणजेच १ लाख ३४ हजार रुपये द्यावे लागतात. तरुणीचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर झाला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी आपला देश हा आपलाच असतो, असे म्हटले आहे. बाहेर तुम्ही कितीही पैसे कमवा तरी ते कमीच पडतात. तर, तरुणीचे दिलेले कारण ऐकून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.