मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Share Market: शेअर बाजारात जबरदस्त उसळी.. गुलजार, SENSEX १६०० अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची चांदी

Share Market: शेअर बाजारात जबरदस्त उसळी.. गुलजार, SENSEX १६०० अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची चांदी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 30, 2022 04:39 PM IST

आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक(Sensex) १५६४अंकांनी वधारला तरमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकनिफ्टी(Nifty) ४४६अंकांनी उसळला.

शेअर बाजारात जबरदस्त उसळी
शेअर बाजारात जबरदस्त उसळी

मुंबई - भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्यातील (Stock Market Updates) पहिले दोन दिवस चढ-उताराचे ठरले आहेत. सोमवारी बाजारात कमालीची घसरण दिसून आली तर आज शेअर बाजार बऱ्यापैकी सावरला. सोमवारी सेंसेक्स  ९०० अंकांनी घसरला होता तर मंगळवारी हा निर्देशांक तब्बल १६०० अंकांनी वधारला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस चांगलाच लाभदायक ठरला. 

आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (Sensex) १५६४ अंकांनी वधारला तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) ४४६ अंकांनी उसळला. सेन्सेक्समध्ये आज २.७० टक्क्यांची वाढ होऊन तो ५९,५३७ अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये २.५८ टक्क्यांची वाढ होऊन तो १७,७५९ अंकांवर स्थिरावला.

आज शेअर बाजारात २३२३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर १००७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज शेअर बाजार बंद होताना जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्यामध्ये फायनान्स, ऑटो, रिअॅलिटी आणि उर्जा क्षेत्रातल्या इंडेक्समध्ये चांगली वाढ झाली. तर बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये एक टक्क्यांहून अधिकची वाढ झाली. 

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८७ अंकांनी वधारत ५८२५९ अंकांवर सुरू झाला. तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी १०१ अंकांनी वधारत १७४१४ च्या पातळीवर खुला झाला. सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ५०५ अंकांनी वधारला.

WhatsApp channel

विभाग