मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वेत इतकी गर्दी की, लोकांना टॉयलेटमध्ये उभे राहून करावा लागला प्रवास; VIDEO झाला व्हायरल

रेल्वेत इतकी गर्दी की, लोकांना टॉयलेटमध्ये उभे राहून करावा लागला प्रवास; VIDEO झाला व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 26, 2024 03:23 PM IST

Railway Video Viral : ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरली असून अनेक लोक ट्रेनमध्ये चढण्याची कसरत करत आहेत. ज्या प्रवाशांना या स्टेशनवर उतरायचे आहे, त्यांनाही मोठ्या मुश्किलीचा सामना करावा लागत आहे.

Indian railways viral video
Indian railways viral video

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये उभे राहून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. ही व्हिडिओ क्लिप लखनौमधील चारबाग रेल्वे स्टेशनवरील असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दिसते की, ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरली असून अनेक लोक ट्रेनमध्ये चढण्याची कसरत करत आहेत. ज्या प्रवाशांना या स्टेशनवर उतरायचे आहे, त्यांनाही मोठ्या मुश्किलीचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, अनेक प्रवासी आपले सामान घेऊन ट्रेनमध्ये चढण्याचा व उतरण्याचा प्रयत्न करत आहेत.

ही व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ही घटना भारतीय रेल्वे प्रशासनापर्यंत गेली आहे. इंडियन रेल्वेकडून एका पोस्टच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की, याबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल.ट्रेनमध्ये प्रवाशांची इतकी प्रचंड गर्दी आहे की, लोक टॉयलेटमध्ये उभे राहून प्रवास करत आहेत व त्यांना तेथेही जागा मिळत नाही. दरम्यान ट्रेनमधील गर्दी पाहून अनेक प्रवाशांनी ट्रेनमध्ये न चढण्याचा निर्णय घेत पुढच्या ट्रेनची वाट वाहणे योग्य समजले. रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालयात अनेक लोक थांबले व त्यांनी पुढच्या ट्रेनची प्रतीक्षा केली.


व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवाशांचा आवाज ऐकू येत आहे. एक प्रवासी म्हणतो की, बाथरूममध्ये जाऊन उभे राहीन. प्रवाशी त्रस्त दिसत असून त्यांना काय करावे सुचत नाही. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, ट्रेनच्या टॉयलेटमध्ये काही लोक उभे असून बाहेर ट्रेमध्ये चढण्यासाठी लोकांमध्ये चाललेली सर्कस पाहत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत अशी स्थिती पुन्हा उत्पन्न होऊ नये, अशी आशा व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे सेवा नावाचे ऑफिशियल एक्स अकाउंट आहे. त्यावर रेल्वेकडून या व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,'आवश्यक कार्यवाहीसाठी प्रकरण संबंधित अधिकारी, डीआरएम लखनौकडे पाठवले आहे.'

IPL_Entry_Point