दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावते. प्रवासा दरम्यान प्रवासी अनेकदा अवजड सामान घेऊन जातात. मात्र, प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वेने सामान वाहून नेण्याची मर्यादा निश्चित केली आहे. ही मर्यादा ओलांडल्यास प्रवाशाला दंडही भरावा लागू शकतो.
रेल्वेच्या नियमानुसार वेगवेगळ्या डब्यांमध्ये मोफत सामानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
एखाद्या प्रवाशाला या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जायचे असेल तर रेल्वेच्या ब्रेक व्हॅनमध्ये सामान बुक करणे बंधनकारक आहे.
रेल्वेने बॅग आणि सूटकेसचा आकारही मर्यादित केला आहे. प्रवाशांना १०० सेंमी बाय ६० सेंमी बाय २५ सेंमीपर्यंतच ट्रंक, सूटकेस किंवा बॉक्स वाहून नेता येतील. प्रवासी डब्यात यापेक्षा मोठ्या सामानाला परवानगी नाही आणि ते ब्रेक व्हॅनमध्ये बुक करणे आवश्यक आहे. विशेषत: एसी थ्री टायर आणि चेअर कारमधील सामानाचा आकार ५५ सेंमी बाय ४५ सेंमी बाय २२.५ सेंमीपर्यंतच असावा.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने गाड्यांमध्ये काही वस्तू नेण्यास बंदी घातली आहे. यामध्ये रसायने, फटाके, गॅस सिलिंडर, अॅसिड, ग्रीस, लेदर आणि इतर धोकादायक वस्तूंचा समावेश आहे. जर एखादा प्रवासी या वस्तूंसह पकडला गेला तर त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अन्वये कठोर कारवाई केली जाऊ शकते.
भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान सामानाशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सामान विहित मर्यादेत ठेवा आणि मोठे सामान वेळेत बुक करा. यामुळे प्रवास सुरळीत तर होतोच, शिवाय इतर प्रवाशांचीही सोय होते. रेल्वे सातत्याने आपले नियम आणि सेवांमध्ये सुधारणा करत आहे. 'वंदे भारत'सह नव्या गाड्यांची भर पडल्याने प्रवाशांना आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव येत आहे. अशा वेळी नियमांचे पालन करून आपण सर्व रेल्वे सेवा अधिक चांगल्या करू शकतो.
संबंधित बातम्या