Indian Rrailway news : अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना भारतीय रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांना आता यूटीएस अर्थात अनारक्षित तिकीट प्रणालीद्वारे कोणत्याही स्थानकावरून अनारक्षित तिकीट बुक करता येणार आहे. मोबाइल द्वारे देखील या तिकीट बूक करता येणार आहे. मात्र, ही सुविधा स्थानक परिसराबाहेर पुरती मर्यादित राहणार आहे. रेल्वेने जिओ फेन्सिंग अंतर्गत सीमा कायम ठेवल्या आहेत.
रेल्वे अधिकारी सौरभ कटारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे प्रवासी घरी बसून कोणत्याही स्थानकावरून अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करता येणार आहे. विशेष म्हणजे जिओ फेन्सिंग अंतर्गत सीमा कायम ठेवली जाणार आहे. म्हणजेच नवीन सुविधा ही केवळ स्थानक परिसराबाहेर उपलब्ध राहणार आहे. रेल्वेने जिओ फेन्सिंगची बाह्य मर्यादा रद्द करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे पूर्वी जिओ फेन्सिंगची बाह्य मर्यादा ही ५० किमी होती. याअंतर्गत प्रवाशांना ५० किमीच्या परिघात स्टेशनवरून अनारक्षित किंवा प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करता येणार आहे. आता नव्या प्रणालीनुसार हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. यूटीएसच्या मदतीने प्रवाशांना स्टेशनच्या तिकीट खिडकीबाहेर लागणाऱ्या लांबलचक रांगांपासून दिलासा मिळणार आहे. तसेच रेल्वे प्रवास यामुळे अधिक सोयीस्कर होणार आहे.
भारतीय रेल्वेने उन्हाळ्यात जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्या दादर-गोरखपूर, एलटीटी मुंबई-गोरखपूर आणि सीएसएमटी मुंबई-दानापूर दरम्यान धावणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, या सर्व गाड्या अनारक्षित तिकीट लागू होणार आहे. तसेच सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या शुल्कासह यूटीएस सिस्टमद्वारे या गाड्यांमध्ये जागा बुक करता येणार आहे. या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या