मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Railway Viral Video: रेल्वे डब्यात कचऱ्याचे ढीग पाहून प्रवासी थक्क, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Railway Viral Video: रेल्वे डब्यात कचऱ्याचे ढीग पाहून प्रवासी थक्क, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

May 26, 2024 09:44 PM IST

Indian Latest Viral Video: भारतीय रेल्वेचा लेटेस्ट व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारतीय रेल्वेचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय रेल्वेचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral News: सोशल मीडियावर भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. अशा व्हिडिओंमुळे अनेकदा रेल्वे प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात प्रवासी रेल्वे साफ करताना दिसत आहे. त्यानंतर तिथे बसलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला. रेल्वेमध्ये अस्वच्छता ही सामान्य बाब झाली. हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रेल्वे कोच साफ करताना खूप कचरा साचलेला दिसत आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. व्हिडीओमध्ये प्रवासादरम्यान सफाई कर्मचारी रेल्वेचा साफ करण्यासाठी आले असता बाहेर पडलेले कचऱ्याचे ढीग पाहून सर्वच शॉक झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. @Just.indian.things या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ सात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि २० हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले की, “संपूर्ण कोचमध्ये फक्त ४ डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. होय, लोकांना काही नागरी ज्ञानाची गरज आहे, परंतु प्रत्येक डब्यातील डस्टबिनची संख्या देखील वाढवायला हवी.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, “१४० कोटी लोक स्वच्छतेसाठी वचनबद्ध असल्याशिवाय भारत “विकसनशील देश” वरून “विकसित देश” मध्ये कधीही बदलणार नाही, मग कोणताही राजकीय पक्ष केंद्रस्थानी असो.”

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग