प्रवाशांना खुशखबर..! जानेवारीपासून धावणार अनेक स्पेशल ट्रेन्स, मुंबई, नागपूर, पुण्यासह असा असणार मार्ग व वेळापत्रक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रवाशांना खुशखबर..! जानेवारीपासून धावणार अनेक स्पेशल ट्रेन्स, मुंबई, नागपूर, पुण्यासह असा असणार मार्ग व वेळापत्रक

प्रवाशांना खुशखबर..! जानेवारीपासून धावणार अनेक स्पेशल ट्रेन्स, मुंबई, नागपूर, पुण्यासह असा असणार मार्ग व वेळापत्रक

Dec 30, 2024 01:44 PM IST

Indian Railway : उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी रेल्वेने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, यूपी, बिहार, राजस्थान, गुजरातसह देशातील अनेक राज्यातून स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

जानेवारीपासून धावणार अनेक स्पेशल ट्रेन्स
जानेवारीपासून धावणार अनेक स्पेशल ट्रेन्स

Indian Railway Special Train : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी रेल्वेने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, यूपी, बिहार, राजस्थान, गुजरातसह देशातील अनेक राज्यातून स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मऊ, पुणे-मऊ-पूणे कुंभ मेळा विशेष ट्रेन, नागपूर-दानापूर-नागपूर स्पेशल आणि राणी कमलापती-बनारस-रानी कमलापती कुंभ स्पेशल यासह अनेक विशेष गाड्यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर अजमेर शरीफ ऊरुसासाठीही विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. याचबरोबर अनेक ट्रेन रद्द करण्याचा निर्णयही रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

जानेवारीपासून महाराष्ट्रातून सुरू होणाऱ्या स्पेशल ट्रेन खालीलप्रमाणे - 

  • गाडी क्रमांक ०१०३३  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ कुंभमेळा स्पेशल ट्रेन ९, १७, २२, २५ जानेवारी तसेच ५, २२, २६ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी साडे अकरा वाजता रवाना होईल. ही गाडी खिरकिया, हरदा, बनापुरा, इटारसी मार्गे दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता मऊ स्टेशनवर पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०१०३४  मऊ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुंभमेळा स्पेशल ट्रेन १०, १८, २३, २६ जानेवारी तसेच ६, २३, २७ फेब्रुवारी रोजी  मऊ स्टेशनवरून १२.५० वाजता रवाना होईल दुसऱ्या दिवशी १४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०१४५० पुणे – मऊ कुंभ मेळा स्पेशल दिनांक ८, १६, २४ जानेवारी व ६, ८ व २१ फेब्रुवारी रोजी पुण्यातून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता मऊ पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१४५६ कुंभ मेळा विशेष- ९, १७ २५ जानेवारी तसेच ७ , ९ २२ फेबिरुवारी रोजी मऊ येथून रात्री ११.५० वाजता प्रस्तान करेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता पुण्यात येईल. 
  • गाड़ी क्रमांक ०१२१७  नागपूर – दानापूर कुंभ मेळा विशेष  २६ जानेवारी तसेच ५, ९ व २३ फेब्रुवारी रोजी नागपूरहून सकाळी १०.१० वाजता प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता दानापूर पोहोचेल. ०१२१८  कुंभ मेळा विशेष- २७ जानेवारी आणि ६, १० आणि २४ फेब्रुवारी रोजी दानापूरहून सायंकाळी ४ वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी साडे पाच वाजता नागपूरला पोहोचेल. 

 

अजमेर ऊरुसासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेन –

  • गाड़ी संख्या ०७७३२  काचीगुड़ा-अजमेर स्पेशल ट्रेन ३ जानेवारी २०२५ रोजी काचीगुडा स्टेशनवरून रात्री २३.०० वाजता रवाना होई व भोपाळ मार्गे तिसऱ्या दिवशी १४.३० वाजता अजमेरला पोहोचेल. स्टेशन पहुंचेगी।
  • गाड़ी संख्या ०७७३३ अजमेर-काचीगुडा स्पेशल ट्रेन  ८ जानेवारी २०२५ रोजी अजमेर स्टेशनवरून रात्री १९.०५ वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता काचीगुड़ा स्टेशनवर पोहोचेल.
  • गाड़ी संख्या ०७११९  तिरुपती-मदार स्पेशल ट्रेन  २ जानेवारी रोजी तिरुपती स्टेशनवरून सकाळी ७ वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी सव्वा तीन वाजता मदार स्टेशनवर पोहोचेल.
  • गाड़ी क्रमांक ०७१२० मदार-तिरुपती स्पेशल ट्रेन  ९ जानेवारी २०२५ रोजी मदार स्टेशनवरून पहाटे ४ वाजता प्रस्थान करून दिसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता तिरुपतीला पोहोचेल.
  • गाड़ी क्रमांक ०७७३४ तिरुपती-अजमेर स्पेशल ट्रेन  ३ जानेवारी २०२५ रोजी तिरुपती स्टेशनवरून सकाळी १०.२५ वाजता रवाना होईल. तिसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता अजमेरला पोहोचेल. 
  • गाड़ी क्रमांक ०७७३५  अजमेर-तिरुपती स्पेशल ट्रेन  १० जानेवारी २०२५ रोजी अजमेर स्टेशनवरून रात्री २३.२० वाजता प्रस्तान करेल व तिसऱ्या दिवशी दुपारी सव्वा चार वाजता तिरुपतीला पोहोचेल. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर