Indian in USA: रिटर्न तिकिट नसल्याच्या कारणावरून भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाकारला; ट्रम्पच्या घोषणेमुळे फटका
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian in USA: रिटर्न तिकिट नसल्याच्या कारणावरून भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाकारला; ट्रम्पच्या घोषणेमुळे फटका

Indian in USA: रिटर्न तिकिट नसल्याच्या कारणावरून भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाकारला; ट्रम्पच्या घोषणेमुळे फटका

Jan 24, 2025 04:07 PM IST

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच इमिग्रेशनचे नियम कडक केले आहेत. याचा फटका दोन भारतीय नागरिकांना बसला आहे. आपल्या मुलाला भेटायला गेलेल्या या पालकांना रिटर्न तिकीट नसल्याचे कारण देत अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आहे

रिटर्न तिकिट नसल्याच्या कारणावरून दोन भारतीयांना अमेरिकेने प्रवेश नाकारला
रिटर्न तिकिट नसल्याच्या कारणावरून दोन भारतीयांना अमेरिकेने प्रवेश नाकारला (AFP)

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून इमिग्रेशन नियमांमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकारी अलर्ट मोडवर गेले असून याचा पहिला फटका अमेरिकास्थित स्थलांतरित भारतीय समुदायाला बसला आहे. अमेरिकेत एच 1-बी सारख्या तात्पुरत्या व्हिसावर काम करत असलेले अनेक भारतीय राहत आहेत. नव्या इमिग्रेशन नियमांमधील यात संभाव्य बदल कोणते होणार याबाबत येथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी सध्या नुसती घोषणा केली आहे. परंतु नेमके बदल काय केले जाणार याविषयी अनिश्चितता आहे. ट्रम्प हे इमिग्रेशन धोरणे कठोरपणे राबविण्याबाबत ओळखले जातात. त्यामुळे या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

रिटर्न तिकीट हरवल्याने भारतीय पालकांना अमेरिकेत प्रवेश नाकारला

'मिर्ची 9' या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेत काम करत असलेल्या आपल्या मुलाला भेटायला गेलेल्या भारतीय पालकांना परतीचे तिकीट का काढले नाही, असं सांगतत नेवार्क शहराच्या विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला आहे. या दाम्पत्याजवळ बी-१/बी-२ व्हिजिटर व्हिसावर प्रवास करत होते. त्यांची अमेरिकेत पाच महिने राहण्याची योजना होती. मात्र इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी २०२५ च्या नव्या नियमांनुसार परतीचे तिकीट बंधनकारक असल्याचे सांगत त्यांना प्रवेश नाकारला. या दोन भारतीयांनी अनेक विनवण्या केल्या तसेच स्पष्टीकरण दिले. यानंतरही त्यांना विमानतळावरून थेट भारतात परत पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिजिटर्स व्हिजाधारकांना रिटर्न तिकीट काढणे बंधनकारक असल्याच्या नव्या नियमाबाबत अमेरिकी अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याने अनेक भारतीय प्रवासी संभ्रमात पडले आहेत.

अघोषित नियम बदलामुळे गोंधळ

या नव्या नियमाच्या अनपेक्षित अंमलबजावणीमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोर्ट ऑफ एन्ट्रीवरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पालकांना प्रवेश नाकारण्यामागे २०२५ च्या नियमांचा आधार घेतला. मात्र, या बदलांबाबत पूर्वसूचना दिली गेली नसल्याने अनेकजण अंधारात आहेत. अशा धोरणात्मक बदलांचे दूरगामी परिणाम लक्षात घेता अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टता आणि पारदर्शकतेची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

भारतीय प्रवाशांसाठी खबरदारीचे उपाय

ही ताजी घटना म्हणजे अमेरिकेला जाणारे भारतीय नागरिक तसेच अमेरिकेत येणाऱ्या विविध देशांच्या संभाव्य गेस्ट यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अमेरिकी विमानतळांवर आणखी कोणते अनपेक्षित उपाय योजले जाऊ शकतात, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. इमिग्रेशनची कडक धोरणे राबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ख्याती लक्षात घेता प्रवाशांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी परिस्थिती टाळण्यासाठी परतीची तिकिटे, प्रवासामागचा हेतु, त्याबाबतचे पुरावे याची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करणे आता महत्वाचे झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर