PNG Jewellers news : अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर मोठा दरोडा; हातोडे घेऊन दरोडेखोर घुसले, सव्वा दोन मिनिटांत शोरूम साफ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PNG Jewellers news : अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर मोठा दरोडा; हातोडे घेऊन दरोडेखोर घुसले, सव्वा दोन मिनिटांत शोरूम साफ

PNG Jewellers news : अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर मोठा दरोडा; हातोडे घेऊन दरोडेखोर घुसले, सव्वा दोन मिनिटांत शोरूम साफ

Updated Jun 15, 2024 06:03 PM IST

US PNG Jewellers Robbery news : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथं भारतीय मालकीच्या पीएनजी ज्वेलर्सवर भयानक दरोडा पडला आहे.

अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर मोठा दरोडा; हातोडे घेऊन दरोडेखोर घुसले, अडीच मिनिटांत शोरूम साफ
अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर मोठा दरोडा; हातोडे घेऊन दरोडेखोर घुसले, अडीच मिनिटांत शोरूम साफ

US PNG Jewellers Robbery news : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सनीवेल इथं भारतीय मालकीच्या पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूमवर दिवसाढवळ्या दरोडा पडला आहे. तोंडाला मास्क लावून व हातात हातोडे घेऊन काळ्या कपड्यात आलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या सव्वा दोन सेकंदात संपूर्ण शोरूम लुटून नेल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.

१२ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास हा दरोडा पडला. या दरोड्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २० संशयित अचानक पीएनजीच्या शोरूममध्ये घुसले. काचेचे दरवाजे हातोड्यानं तोडून हे चोरटे घुसले. आत घुसल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी डिस्प्ले केस फोडायला सुरुवात केली. काही जण डिस्प्ले केस फोडत असताना बाकीचे लोक दागिने त्यांच्याकडी पिशव्यांमध्ये गोळा करत होते. अवघी २ मिनिटे १५ सेकंदात या चोरट्यांनी संपूर्ण शोरूम रिकामा केला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्याआधीच दागिन्यांसह इतर ऐवज घेऊन चोरटे वेगवेगळ्या गाड्यांमधून निसटले होते. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरोडेखोरांनी चालत्या वाहनातून काही दागिने टाकून दिले.

या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. संपूर्ण शोरूममध्ये काचांचा खच पडलेला दिसत आहे. सुदैवानं या लूटमारीत कोणीही जखमी झालेलं नाही.

पीएनजी ज्वेलर्समध्ये घुसलेले दरोडेखोर
पीएनजी ज्वेलर्समध्ये घुसलेले दरोडेखोर

याआधीही भारतीय शोरूम झालेत लक्ष्य

भारतीय मालकीच्या ज्वेलर्सवर दरोडा पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ४ मे रोजी सनीवेल येथील नितीन ज्वेलर्स आणि २९ मे रोजी नेवार्कमधील भिंडी ज्वेलर्स इथं अशाच प्रकारची दरोडा टाकण्यात आला होता. या तिन्ही चोऱ्यांची पद्धत एकच असल्यामुळं हे काम एकाच टोळीचं असल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. भारतीय शोरूमनाच का लक्ष्य केलं जात आहे याचाही शोध घेतला जात आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सनीवेलचे महापौर लॅरी क्लेन, उपमहापौर मुरली श्रीनिवासन आणि सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी १४ जून रोजी सिटी हॉलमध्ये अमेरिकेतील भारतीय व्यावसायिक आणि समुदायाच्या नेत्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत सनीवेलमधील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली व सर्वांना आश्वस्त करण्यात आलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर