भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांनी सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या निवडणुकीत मारली बाजी! भरघोस मतांनी झाला विजय
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांनी सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या निवडणुकीत मारली बाजी! भरघोस मतांनी झाला विजय

भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांनी सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या निवडणुकीत मारली बाजी! भरघोस मतांनी झाला विजय

Nov 06, 2024 01:05 PM IST

US elections Update : राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म भारतात झाला. मात्र, अमेरिकेतील बफेलो येथे लहाणाचे मोठे झाले. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी इलिनॉयचे डेप्युटी स्टेट कोषाध्यक्ष पद भूषवले होते.

भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांनी सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या निवडणुकीत मारली बाजी! भरघोस मतांनी झाला विजय
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांनी सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या निवडणुकीत मारली बाजी! भरघोस मतांनी झाला विजय (x/@RajaForCongress)

US elections Update : अमेरिकेत सध्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, भारतीय वंशाचे डेमोक्रॅट उमेदवार राजा कृष्णमूर्ती यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला आहे. त्यांनी रिपब्लिकन उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.  मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस २०५ मतांनी आघाडीवर आहेत. तर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प २७० च्या जादुई आकड्यापासून अवघ्या काही अंतरावर आहेत.

इलिनॉयच्या आठव्या कॉंग्रेशनल डिस्ट्रिक्टमधून कृष्णामल्टी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. ते अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये या भागाचे प्रतिनिधित्व करतील. त्यांनी ५७.१ टक्के मते मिळवून निवडणूक जिंकली. रिपब्लिकन पक्षाचे मार्क राइस यांना मात्र ४२.९ टक्के मते मिळाली. कृष्णमूर्ती यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती.

कोण आहेत राजा कृष्णमूर्ती ? 

राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म भारतात झाला, पण ते अमेरिकेतील बफेलो येथे लहणाचे मोठे झाले. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी इलिनॉयचे डेप्युटी स्टेट कोषाध्यक्ष पद भूषवले होते. इलिनॉयचे विशेष सहाय्यक अॅटर्नी जनरल आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे धोरण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कृष्णमूर्ती हे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसह धोरणांचे समर्थन करतात. सध्या ते इंटेलिजन्स अँड ओव्हरसाइट कमिटीचे वरिष्ठ सदस्य आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांना २३०  इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली असून त्यांना २०५  मते मिळाली आहेत. २७० किंवा त्यापेक्षा अधिक इलेक्टोरल कॉलेज मते मिळविणारा उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडला जातो. व्हाईट हाऊसच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याचे चित्र अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन या सात 'स्विंग स्टेट्स'च्या निकालावर अवलंबून असेल.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर