मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  california: अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या चौघांची हत्या; ८ महिन्यांच्या मुलीचाही समावेश

california: अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या चौघांची हत्या; ८ महिन्यांच्या मुलीचाही समावेश

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 06, 2022 11:59 AM IST

Indian Origin Family Kidnapped: अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चारही जणांचे ३ ऑक्टोबरला अपहरण झाले होते. जबरदस्तीने त्यांना पळवून नेण्यात आले होते.

अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या चौघांचे मृतदेह सापडले
अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या चौघांचे मृतदेह सापडले (AP)

Indian Origin Family Kidnapped: अमेरिकेतील कॅलिफोर्नियात पंजाबमधील एका कुटुंबाचे अपहरण झाले होते. त्या चार सदस्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये एका आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. मर्स्ड काउंटीचे शेरिफ वर्न वार्नके यांनी सांगितले की, हे खूपच भयंकर आणि भीतीदायक आहे. पीडीतांचे शव त्याच भागात सापडले आहेत.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चारही जणांचे ३ ऑक्टोबरला अपहरण झाले होते. जबरदस्तीने त्यांना पळवून नेण्यात आले होते. पीडित कुटुंब हे अमेरिकेत ट्रान्सपोर्ट व्यवसाय करत होते. ते मूळचे पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील टांडामधील हरसी गावचे होते. अद्याप या प्रकरणी कोणत्याही संशयिताचे नाव पोलिसांकडून सांगण्यात आलेलं नाही.

याआधी कॅलिफोर्निया पोलिसांनी या प्रकरणी ४८ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकऱणात अपहरणात सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे. अहपरण झालेलं कुटुंब मूळचं पंजाबमधील होतं. त्यात ३६ वर्षांचे जसदीप सिंह, त्यांची पत्नी जसलीन कौर, ८ महिन्यांची मुलगी अरुही आणि ३९ वर्षीय अमनदीप सिंह यांचा समावेश होता.

मर्स्ड काउंटीतील एटवॉटरमध्ये एका एटीएममधून पीडित व्यक्तीच्या बँक कार्डवरून पैसे काढल्याची माहिती मिळाली होती. त्याआधी कॅलिफोर्नियातील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी मेरेडमध्ये एका ग्रामीण भागात अमनदिप सिंह यांचा आग लागलेला ट्रक जप्त केला होता. अपहरणकर्त्यांनी आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं यातून दिसून येतं असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग