मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतीय वंशाच्या कुटुंबाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू; कर्ज फेडण्यासाठी विकला होता आलिशान बंगला

भारतीय वंशाच्या कुटुंबाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू; कर्ज फेडण्यासाठी विकला होता आलिशान बंगला

Dec 31, 2023 12:51 PM IST

Indian Origin Couple Found Dead US Massachusetts : भारतीय वंशांचे तसेच अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील श्रीमंत कुटुंबीय म्हणून ओळख असलेल्या राकेश कमल यांचे संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या आलीशान बंगल्यात मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Indian-Origin Couple, Found Dead US Massachusetts
Indian-Origin Couple, Found Dead US Massachusetts

Indian-Origin Couple, Found Dead US Massachusetts : अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्समध्ये एका आलीशान बंगल्यात राहणाऱ्या भारतीय वंशाचे श्रीमंत कुटुंब हे मृतावस्थेत आढळले. पती पत्नी आणि त्यांची तरुण मुलीचा मृतदेह हा संशयास्पद अवस्थेत आढळला. पोलिसांना घटनास्थळी बंदूक आढळली आहे. कौटुंबिक हिंसाचारातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हे कुटुंब येथील श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जात होते. फॉरेन्सिक अहवाल आल्यावर आत्महत्या की घातपात याचा उलगडा होणार आहे. 

Waluj MIDC Fire : वाळूज एमआयडीसीत अग्नितांडव, हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, ६ कामगारांचा जळून मृत्यू

राकेश कमल (वय ५७), त्यांची पत्नी टीना (वय ५४) व त्यांची १८ वर्षांची मुलगी एरियाना असे मृतावस्थेत आढळलेल्या भारतीय वंशांच्या कुटुंबियांचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी या सर्वांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात कौटुंबिक हिंसाचारातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला. राकेश कमल कुटुंब हे मूळचे भारतातीय असून अमेरिकेत त्यांनी आयटी इंडस्ट्रीमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली होती. ते एड्युनोव्हा नावाची शैक्षणिक कंपनी देखील चालवत होते. मात्र ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बंद पडली आहे.

Indian-Origin Couple, Found Dead US Massachusetts
Indian-Origin Couple, Found Dead US Massachusetts
ट्रेंडिंग न्यूज

गुरुवारी नेमके काय घडले ?

पोलिसांना गुरुवारी संध्याकाळी ७.२४ वाजता कमल कुटुंबाच्या एका नातेवाईकाचा फोन आला. ते काही दिवसांपासूंन कमल कुटुंबियांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. दरम्यान, एका आलीशान बंगल्यात कमल कुटुंबीय हे राहत होते. त्यांचे घर हे येथील उच्चभ्रू भागात असून पोलिस जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा घरात राकेश, टीना आणि आरियाना यांचे मृतदेह त्यांना आढळून आले.

manipur violence : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच! जमावाचा पोलिसांवर गोळीबार; एकाची हत्या

नॉरफोक डिस्ट्रिक्ट अॅटर्नी म्हणाले की ते "ही घटना भयंकर आहे. नेमके काय झाले याचा तपास पोलिस करत आहेत. फॉरेन्सिक अहवाल आल्यावर त्यांनी आत्महत्या केली की काही घातपात झाला आहे याचा उलगडा होईल, असे ते म्हणाले. मात्र, राकेश कमलच्या मृतदेहाजवळ एक बंदूक सापडल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांच्या शेजारी त्यांच्या पत्नीचा आणि मुलीचा देखील मृतदेह पडून होता, असे मॉरिसे म्हणाले.

करोडपती उद्योगपती ते दिवाळखोरीपर्यंतचा प्रवास

बोस्टन युनिव्हर्सिटी, एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी असलेले राकेश कमल यांनी शैक्षणिक सल्लागार म्हणून करिअर केले. २०१६ मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीसह एक एड्युकेशन-टेक कंपनीची स्थापना देखील केली. मिडल स्कूल, हायस्कूल आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या मॉडेलने अल्पावधीत यश मिळवले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्यांच्या कंपनीशी जोडले गेले, अशी माहिती बोस्टन ग्लोब वृत्तपत्राने दिली आहे.

कमल यांच्या कंपनी चांगले यश मिळवले. त्यांना यातुन मोठा नफा झाला. यामुळे कमल यांनी तब्बल १९ हजार स्क्वेअर फूट जागेत तब्बल ११ बेडरूम असणारा आलीशान बंगला २०१९ मध्ये ४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये विकत घेतला होता. मात्र, डिसेंबर २०२१ मध्ये दिवाळखोरीत निघाली. येथूनच कमल यांच्या यशाला उतरती कळा लागली. त्यांच्यावरील आर्थिक संकटाची ही सुरुवात होती.

त्यांच्या हा आलीशान बंगला त्यांना दिवाळखोरीमुळे विकावा लागला. वर्षभरापूर्वी मॅसॅच्युसेट्स-आधारित विल्सनडेल असोसिएट्स एलएलसीला त्यांचे घर हे ३ दशलक्ष डॉलर्समध्ये विकले गेले. यावेळी त्यांच्या आलीशान बंगल्याची किंमत ५.४५ दशलक्ष एवढी होती.

भारतातील हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या टीना कमल यांनी देखील सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांच्यावरील आर्थिक संकटाची माहिती दिली होती.

कमल यांची १८वर्षीय मुलगी एरियाना ही मिडलबरी कॉलेजची विद्यार्थिनी होती, तिच्या लिंक्डइननुसार ती व्हरमाँटमधील एका खाजगी उदारमतवादी कला शाळेत न्यूरोसायन्स विषय शिकत होती. तिच्या शाळेने, मिल्टन अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे की एरियाना ही एक गोड, हुशार मुलगी होती.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर