मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  INS Vagir : शत्रूला धडकी ! भारतीय नौदलाची सायलेंट किलर शार्क आयएनएस वागीर पाणबुडी आज होणार नौदलात दाखल

INS Vagir : शत्रूला धडकी ! भारतीय नौदलाची सायलेंट किलर शार्क आयएनएस वागीर पाणबुडी आज होणार नौदलात दाखल

Jan 23, 2023 07:44 AM IST

INS Vagir Submarine Indian Navy: प्रोजेक्ट-75 अंतर्गत बांधण्यात येणारी आयएनएस वागीर ही स्कॉर्पीन प्रकारातील पाचवी पाणबुडी आज नौदलात दाखल होणार आहे. यामुळे नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे.

INS Vagir Submarine
INS Vagir Submarine

मुंबई : प्रोजेक्ट ७५ बी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सहा स्कॉर्पीन फ्रेंच पानबुड्यांपैकी पाचवी पाणबुडी आयएनएस वागीर ही आज नौदलात दाखल होणार आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार असून शत्रूला धडकी भरवणार आहे. आयएनएस वागीर पाणबुडी ही सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणार आहे.

स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 'आयएनएस वागीर' ही भारतीय बनावटीची पाणबुडी आहे. हीची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉक येथे करण्यात आली आहे. ही पाणबुडी कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट ७५' अंतर्गत आतापर्यंत कलावरी श्रेणीतील ४ पाणबुड्या बांधण्यात आल्या असून त्या नौदलाला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांची प्रमुख उपस्थितीत ही पाणबुडी नौदलात दाखल होणार आहे.

'आयएनएस वागीर' पाणबुडीची वैशिष्ट्ये

ही पाणबुडी शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही ने येता ही पाणबुडी शांततेत आपले लक्ष उद्ध्वस्त करू शकते. ही पाणबुडी डिझेल तसेच इलेक्ट्रिकवर चालत असून समुद्रात भूसुरुंग टाकण्यास ही पाणबुडी सक्षम आहे. ही समुद्रात तब्बल ३५० मीटर खोलवर जाऊ शकते. तसेच अनेक महीने ती पाण्याखाली राहू शकते. ही पाणबुडी स्टेल्थ प्रकारातील असून ती शत्रूच्या रडारला देखील चकवा देऊ शकते. या पणबुडत अत्याधुनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली असून ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक तिचा अचूक वेध घेऊ शकते

काय आहे प्रोजेत ७५ ? 

'आयएनएस वागीर' ही 'प्रोजेक्ट ७५, यार्ड ११८७५ अंतर्गत बण्यावण्यात आली आहे. या प्रकल्पा अंतर्गत ६ पणबुड्या तयार केल्या जाणार आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या (MDL) कान्होजी आंग्रे येथे याची बांधणी सुरू आहे. या पूर्वी चार पणबुड्या या नौदलाल या प्रोजेक्ट अंतर्गत देण्यात आल्या आहेत.

WhatsApp channel
विभाग