मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आधी पाकिस्तान मग इराण आणि आता श्रीलंकेचे जहाज चाच्यांपासून वाचवले, ३ दिवसांत भारतीय नौदळाची तिसरी मोठी कारवाई

आधी पाकिस्तान मग इराण आणि आता श्रीलंकेचे जहाज चाच्यांपासून वाचवले, ३ दिवसांत भारतीय नौदळाची तिसरी मोठी कारवाई

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 31, 2024 07:37 AM IST

Indian navy rescues sri lankan vessel from pirates: सेशेल्स संरक्षण दल आणि श्रीलंका नौदलाच्या सहकार्याने भारतीय नौदलाने सोमाली समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या श्रीलंकेच्या जहाजाची यशस्वीरित्या सुटका केली.

 Indian navy rescues sri lankan vessel from pirates
Indian navy rescues sri lankan vessel from pirates

Indian navy rescues sri lankan vessel from pirates: भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रात आपली ताकद सिद्ध केली आहे. भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या एका जहाजाची सोमाली चाच्यांपासून यशस्वीपणे सुटका केली आहे. भारतीय नौदलाची तीन दिवसांतील ही तिसरे यशस्वी कारवाई आहे. याआधी नौदलाने अरबी समुद्रात शौर्य दाखवत सोमाली चाच्यांच्या तावडीतून एका इराणी जहाजाची सुटका केली होती. तसेच १९ पाकिस्तानी मच्छिमारांसह संपूर्ण जहाज वाचले होते.

नौदलाने मंगळवारी प्रसिद्धी पत्रक काढत या बाबत माहिती दिली आहे. सेशेल्स संरक्षण दल आणि श्रीलंका नौदलाच्या सहकार्याने सोमाली चाच्यांनी अपहरण केलेल्या श्रीलंकेच्या जहाजाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. नौदलाच्या म्हणण्यानुसार, तीन समुद्री चाच्यांनी सेशेल्स कोस्ट गार्डला आत्मसमर्पण केले, जहाजवरील सर्व सहा क्रू मेंबर्स सुरक्षित असून जहाज सेशेल्समधील माहे येथे नेले जात आहे.

Maharashtra weather update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीची लाट! गारठा वाढणार, असा आहे हवामानाचा अंदाज

आयएनएस शारदाने केली मोहीम फत्ते

गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात लुटमारीच्या घटना समोर येत आहेत. मोगादिशू, सोमालियाच्या पूर्वेकडे जाणाऱ्या श्रीलंकेच्या मासेमारी जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती नौदलाला मिळाली. २७ जानेवारी रोजी तीन चाच्यांनी फिशिंग ट्रॉलरमध्ये चढून त्यांचे अपहरण केले होते. नौदलाने २८ जानेवारी रोजी मदत करण्यासाठी आयएनएस शारदा या युद्धनौकेला मदतीसाठी पाठवले. तर अपहरण केलेल्या श्रीलंकेच्या जहाजाचा शोध घेण्याचे आणि अडवण्याचे काम हेल सी गार्डियनला दिले.

धक्कादायक! जेवण देण्यास विसरल्याने श्वानाने मालकाचेच तोडले लचके; निष्ठावान प्राणी बनला भक्षक

नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, "त्यांच्या कमांडोनी श्रीलंका आणि सेशेल्सच्या सैन्याच्या मदतीने २९ जानेवारील जहाजाचा माग काढला. काही काळ चाललेल्या या ऑपरेशनमध्ये टीमने तिन्ही समुद्री चाच्यांना पकडले. नौदलाने राबवलेली ही तिसरी यशस्वी मोहीम आहे.

१९ पाकिस्तानी नागरिकांना दिले जीवदान

या पूर्वी नौदलाने राबवलेल्या मोनिमेमध्ये ११ सोमाली चाच्यांपासून १९ पाकिस्तानी नागरिकांच्या क्रूची सुटका करण्यात आली होती. सोमवारी आयएनएस सुमित्राने इराणच्या जहाज एफव्ही इमानवर हल्ला केला होता. हा हल्ला नौदलाने हाणून पाडत १९ पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली होती.

गेल्या वर्षी डिसेंबरपासून अरबी समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर चाचेगिरी आणि क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे भारतीय नौदलाने सुमारे १० ते १२ भारतीय युद्धनौका अरबी समुद्रात तैनात केल्या आहेत, यात INS कोची, INS मोरनुगाव, INS कोलकाता, INS चेन्नई आणि अन्य एक युद्धनौकेचा समावेश आहे.

WhatsApp channel

विभाग