Indian Navy : भारतीय नौदलाला मिळणार आता महिला कमांडो; लवकरच होणार मोठा निर्णय
Indian Navy MARCOS for Women : भारतीय नौदलाच्या मनाच्या मार्कोस कमांडो फोर्समध्ये आता लवकरच महिला अधिकारी सहभागी होणार आहेत. या संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
दिल्ली : भारतीय शस्त्रस्त्र दलाच्या तिन्ही विभागाच्या स्वतंत्र कमांडो फोर्स आहेत. लष्करात स्पेशल फोर्स आणि पॅराकमांडो, हवाई दलात गरुड फोर्स तर नौदलात मार्कोस कमांडो या भारतीय सशस्त्र दलांच्या एलिट स्पेशल फोर्स आहेत. या फोर्समध्ये आतापर्यन्त केवळ पुरुषांनाच सहभागी करून घेतल्या जात होते. मात्र, आता लवकरच या कमांडो फोर्समध्ये महिला देखील दिसणार आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
नौदलाच्या मार्कोस कमांडो फोर्समध्ये लवकरच महिलांना संधी देण्यात येणार असल्याचा निर्णय नौदलाने घेतला असून या संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात नौदलाच्या अधिकाऱ्यांनी हिंदुस्थान टाईम्सला अधिकृत माहिती दिली आहे.
भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही विभागात स्पेशल फोर्स कार्यरत आहेत. अनेक अवघड मोहिमा या कमांडो फोर्स पार पाडत असतात. लष्कराच्या पॅरा कमांडोने पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्रईक पार पडली होती. तसेच नौदलाचा मार्कोस आणि हवाई दलाच्या गरुड फोर्सने देखील अनेक महत्वाच्या मोहीमा पार पडल्या आहेत.
या कमांडो फोर्सचे प्रशिक्षण अत्यंत कठीण असते. मोजक्याच अधिकारी आणि जवानांना हे प्रशिक्षण पूर्ण करता येत. आता या एलिट फोर्स मध्ये आता महिला सुद्धा दिसणार असून अतिशय अवघड मोहिमा आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या पार पडतांना दिसतील. अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसळी तरी भारतीय नौदल या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.
संबंधित बातम्या
विभाग