मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MiG 29K विमानानं केल रात्रीच्या वेळी आएनएस विक्रांतवर यशस्वी लँडिंग, नौदलाची लढाऊ क्षमता वाढणार

MiG 29K विमानानं केल रात्रीच्या वेळी आएनएस विक्रांतवर यशस्वी लँडिंग, नौदलाची लढाऊ क्षमता वाढणार

May 26, 2023 10:40 AM IST

MiG 29K Fighter Landing On INS Vikrant : भारतीय नौदलाने एक नवा इतिहास रचला आहे. स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू जहाज INS Vikrant वर रात्रीच्या वेळी MiG 29K विमानानं यशस्वी लॅंडींग करत मैलाचा दगड गाठला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी मोहिमा करण्याची क्षमता वाढणार असून चीन पाकिस्तानला यामुळे धडकी भरणार आहे.

MiG 29K Fighter Landing On INS Vikrant
MiG 29K Fighter Landing On INS Vikrant

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मैलाचा दगड गाठला आहे. स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू जहाज INS Vikrant वर रात्रीच्या वेळी MiG 29K विमानानं यशस्वी लॅंडींग करत इतिहास रचला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी मोहिमा करण्याची क्षमता वाढणार असून चीन पाकिस्तानला यामुळे धडकी भरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिग २९ हे आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यात आले आहे. हे एक लढाऊ विमान असून अनेक मोहीमा करण्यासाठी सक्षम आहेत. दरम्यान, आयएनएस विक्रांतच्या निर्माणपासून त्याच्या अनेक चाचण्या करण्यात येत आहेत. या पूर्वी तेजस आणि मिग २९ विमानांचे दिवसा यशस्वी लॅंडींग करण्यात आले आहे. मात्र, काल रात्रीच्या वेळी या जहाजावर लॅंडींग करत एक नवा इतिहास रचला आहे.

Grand Canyon Valley: जगातील सर्वात खोल व्हॅली ग्रँड कॅनियनबद्दल जाणून घ्या!

रात्रीच्या वेळी विमानवाहू जहाजावर विमान उतरवणे नौदलासाठी आव्हान होते. विमानवाहू जहाज हे तब्बल ४०ते ५० किमी/ताशी वेगाने पुढे जात असते आणि वैमानिकांना हा वेग साधून विमान जहाजावर उतरवणे एक आव्हान असतं . यापूर्वी तेजस विमानाने आयएनएस विक्रांतवर यशस्वीपणे उतरवण्यात आले होते. हे लॅंडींग दिवसा करण्यात आले होते.

भारतीय नौदलाने या विमानाच्या रात्रीच्या लँडिंगचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हे यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचं नौदलाने म्हटले आहे.

 

मिग २९ फायटर जेट हे INS विक्रांतवर तैनात करण्यात आले आहे. हे अत्याधुनिक मल्टी रोल कॉबॅक्ट विमान आहे. हे विमान आवाजाच्या दुप्पट वेगाने (ताशी २००० किमी) उडू शकते. हे विमान स्वतःच्या वजनापेक्षा तब्बल आठपट जास्त भार वाहून नेण्यास सक्षम आहे.

या यशाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, "आयएनएस विक्रांतवर मिग-२९ के पहिल्या रात्रीच्या लँडिंगची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मी भारतीय नौदलाचे अभिनंदन करतो. ही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे विक्रांत क्रू आणि नौदलाच्या वैमानिकांच्या कौशल्य, दृढता आणि व्यावसायिकतेची साक्ष आहे."

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग