मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Navy : नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास! आता स्वतंत्रपणे करणार भारतीय सागरी सीमेचे रक्षण

Indian Navy : नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास! आता स्वतंत्रपणे करणार भारतीय सागरी सीमेचे रक्षण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 04, 2022 08:42 PM IST

भारतीय नौदलाच्या महिला वैमानिकांनी गुरुवारी एक नवा इतिहास रचला. पोरबंदर येथून उड्डाण घेत अरबी समुद्रात त्यांनी स्वतंत्रपणे टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण इतिहास रचला.

भारतीय नौदलातील महिला अधिकारी
भारतीय नौदलातील महिला अधिकारी

पुणे : भारताच्या तिन्ही बाजूला विस्तीर्ण सागरी सीमा आहे. या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही भारतीय नौदलाची आहे. या साठी, रोज टेहळणी मोहीमा राबविला जातात. आता पर्यन्त या मोहीम फक्त पुरुष अधिकारीच राबवत होते. मात्र, बुधवारी नौदलातील महिला वैमानिक आणि अधिकाऱ्यांनी ही मोहीम स्वतंत्रपणे राबवत एक नवा इतिहास रचला आहे.

पोरबंदर येथील नौदलाच्या नेव्हल एअर एन्क्लेव्ह INAS 314 च्या पाच महिला अधिकार्‍यांनी बुधवारी (दि ३) डॉर्नियर 228 विमानातून उड्डाण करत उत्तर अरबी समुद्रात स्वतंत्र टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करून इतिहास रचला. या पथकात सर्व महिला होत्या. महिलांची अशा प्रकारे स्वतंत्रपणे राबवण्यात आलेली ही पहिलीच मोहीम होती. या मोहिमेच्या प्रमुख लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा होत्या. त्यांच्या पथकात नौदलाच्या पहिल्या वैमानिक लेफ्टनंट शिवांगी आणि लेफ्टनंट अपूर्वा गिते, टॅक्टिकल अँड सेन्सर अधिकारी लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत होत्या. INAS 314 हे गुजरातमधील पोरबंदर येथे तैनात असलेले नौदलाचे आघाडीचे हवाई पथक असून अत्याधुनिक डॉर्नियर 228 सागरी टेहळणी विमानाद्वारे भारतीय सागरी सीमेवर लक्ष ठेवले जाते. या हवाई पथकाचे नेतृत्व कुशल नेव्हिगेशन इन्स्ट्रक्टर असलेल्या कमांडर एस. के. गोयल यांच्याकडे आहे.

अनेक महिन्याच्या प्रशिक्षणांतर मोहीम केली यशस्वी

या मोहिमेसाठी अनेक महिन्यांपासून तयारी सुरू होती. पोरबंदर येथील नौदलाच्या केंद्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात याचे निओजन करण्यात आले. सर्व महिला अधिकाऱ्यांना या मोहिमेचे बारकावे समजून सांगण्यात आले. त्या नंतर बुधवारी ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

या पूर्वी केवळ पुरुष अधिकारिच राबवत होते टेहळणी मोहीम

या पूर्वी टेहळणी आणि देखरेख मोहीम ही फक्त पुरुष अधिकारीच राबवत होते. तर काही महिला अधिकारी या पुरुष अधिकाऱ्यांसोबत या मोहिमेत सहभागी होत होते. मात्र, आता आता ही मोहीम महिला अधिकारी या स्वतंत्र पणे राबविणार आहेत.

<p>नौदलाच्या महिला अधिकारी&nbsp;</p>
नौदलाच्या महिला अधिकारी&nbsp;

काय असते टेहळणी मोहीम

भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. येथील भारताच्या आर्थिक क्षेत्राचा परिसराची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही नौदल अनाई तटरक्षक दलकडे आहे. या मोठ्या सागरी परिसरात लक्ष ठेवण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दल संयुक्त पणे मोहिमा राबत असतात. नौदलाची डोंनीयर विमाने ही अवकाशातून लक्ष ठेवत असतात. आधुनिक यंत्रांच्या माध्यमातून भारतीय हद्दीत संशयित असणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेऊन गैरप्रकार टाळले जातात.

नारी शक्तीचा नारा

भारतीय नौदल सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आघाडीवर आहे. महिला सशक्तीकरणाच्या या प्रभावी आणि अग्रगण्य उपक्रमांमध्ये महिला वैमानिकांची भर्ती, हेलिकॉप्टर परिचालनात महिला हवाई संचालन अधिकाऱ्यांची निवड आणि 2018 मध्ये सर्व महिला असलेल्या पथकाची सागरी जगपरिक्रमा,यांचा समावेश आहे.

IPL_Entry_Point

विभाग