Viral News : दिल्ली-मुंबई नाही तर 'या' देशात घर खरेदी करण्यास भारतीयांची पसंती; काय कारण आहे?-indian investors rush to buy properties in greece under golden visa scheme ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : दिल्ली-मुंबई नाही तर 'या' देशात घर खरेदी करण्यास भारतीयांची पसंती; काय कारण आहे?

Viral News : दिल्ली-मुंबई नाही तर 'या' देशात घर खरेदी करण्यास भारतीयांची पसंती; काय कारण आहे?

Sep 20, 2024 12:37 PM IST

Viral News : भारतीय गुंतवणूकदार घरे खरेदी करण्यासाठी पुणे, मुंबई, दिल्ली नाही तर थेट परदेशातील पॅरोस, क्रेट आणि सार्डिनिया या प्रसिद्ध ग्रीक बेटांकडे आकर्षित होत आहेत.

दिल्ली-मुंबई नाही तर 'या' देशात घर खरेदी करण्यास भारतीयांची पसंती; काय कारण आहे?
दिल्ली-मुंबई नाही तर 'या' देशात घर खरेदी करण्यास भारतीयांची पसंती; काय कारण आहे?

Viral News : भारतीय गुंतवणूकदार आता घर खरेदी करण्यासाठी देशातील पुणे, मुंबई, दिल्ली नाही तर थेट परदेशातील स्थानांना पसंती देत आहेत. गेल्या काही दिवसांत ग्रीसमध्ये भारतीय गुंतवणूकदारांनी घर घेण्यास पसंती दिली आहे. गेल्या काही दिवसांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान ग्रीसमधील भारतीय गुंतवणूकदारांच्या मालमत्ता खरेदीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण, या मागचे कारण काय? याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरे तर १ सप्टेंबरपासून ग्रीसमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. याआधी भारतीय गुंतवणूकदारांना येथील गोल्डन व्हिसा योजनेचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. गोल्डन व्हिसा योजनेंतर्गत कायमस्वरूपी घरे मिळविण्यासाठी लोक आतुर आहेत.

२०१३ मध्ये सुरू झालेली ग्रीसची गोल्डन व्हिसा योजना मालमत्तेतील गुंतवणुकीच्या मोबदल्यात तेथील निवास परवाना देते. या योजने अंतर्गत ते गैर-युरोपियन नागरिकांना देखील देशात निवास परवाना देतात. ग्रीसमध्ये घर घेण्याचा आणि तेथील निवास परवाना मिळवण्याचा एक चांगला पर्याय आहे. या योजनेची सुरुवातीची मर्यादा सुमारे २५०,००० युरो म्हणजेच २.२ कोटी रुपये एवढ्या कमी कमी किमती युरोपमध्ये घर घेत येत असल्याने अनेक भारतीय गुंतवणूकदार या कडे आकर्षित झाले आहेत. यामुळे ग्रीसच्या रिअल इस्टेट मार्केटलाही चालना मिळाली आहे. भारतीय गुंतवणूकदार मालमत्ता खरेदी करण्यासाठी पॅरोस, क्रेट आणि सार्डिनियासारख्या प्रसिद्ध ग्रीक बेटांना पसंती देत आहेत.

नियम बदलणे होते आवश्यक

मात्र, मागणी वाढल्याने येथील घरांच्या किमती देखील आता मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. राजधानी अथेन्स, थेस्सालोनिकी, मायकोनोस आणि अंतल्या सारख्या भागात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या समस्येचा सामना करण्यासाठी, ग्रीक सरकारने १ सप्टेंबर २०२४ पासून या भागातील मालमत्तांसाठी गुंतवणुकीची मर्यादा ही ८००,००० युरो (अंदाजे ७ कोटी रुपये) पर्यंत वाढवली आहे. वाढत्या किमती थांबवणे आणि कमी विकसित भागात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा या नियमांचा उद्देश आहे.

गोल्डन व्हिसा अंतर्गत मिळणार फायदे

लेप्टोस इस्टेट्सचे ग्लोबल मार्केटिंग डायरेक्टर संजय सचदेव म्हणाले की, अलिकडच्या काही महिन्यांत भारतीय खरेदीदारांचा ग्रीसमध्ये घर खरेदी करण्याचा ओघ वाढला आहे. अनेकांनी सहा ते बारा महिन्यांच्या कालावधीत बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तांमध्येही गुंतवणूक केली आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी ग्रीसच्या गोल्डन व्हिसा योजनेत अनेक ऑफर होत्या. ग्रीस दरवर्षी ३ ते ५ टक्के आकर्षक भाडे उत्पन्न देते. याव्यतिरिक्त, ग्रीसमधील मालमत्तेची मूल्ये दरवर्षी १० टक्के प्रभावशाली दराने वाढत आहेत. कोरोनानंतर यात लक्षणीय वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा, शिक्षण आणि यूरोपीयन युनियनमध्ये व्यवसाय करण्याची देखील मोठी संधी मिळते.

Whats_app_banner
विभाग