Paneer and Milk Controversy: एका भारतीय डॉक्टरने दूध आणि पनीरला मांसाहारी पदार्थ म्हटल्याने सोशल मीडियावर दोन गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आहे. दूध आणि पनीर प्राण्यांकडून मिळतात आणि म्हणूनच त्यांना शाकाहारी पदार्थ म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, असे डॉ. सिल्व्हिया करपागम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मात्र, या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. डॉक्टरांच्या या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
क्स युजर सुनीता सयामगारू यांनी जेवणाच्या थाळीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी नवऱ्याच्या शाकाहारी जेवणाची थाळी असे लिहिले आहे. या पोस्टवर कमेंट करताना इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्सच्या वर्किंग एडिटर डॉ. सिल्विया करपागम यांनी दूध आणि पनीर शाकाहारी पदार्थ नसल्याचे म्हटले. चिकन, मासे, गोमांसप्रमाणे पनीर आणि दूध देखील शाकाहारी नाही, जे आपल्याला प्राण्यांकडून मिळते.
डॉ. सिल्व्हिया यांनी केलेल्या कमेंटमुळे नेटकऱ्यांमध्ये दोन गट निर्माण झाली आहेत. अनेकांनी डॉ. सिल्व्हिया यांच्या मताशी सहमती दर्शवली. तर, काहींना तीव्र विरोध दर्शवला. तसेच आपली बाजू मांडली.
अनेक एक्स वापरकर्त्यांनी सांगितले की, पनीर आणि दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ शाकाहारी आहेत. कारण ते मिळविण्यासाठी प्राण्यांचा जीव घेतला जात नाही. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, दुग्धजन्य पदार्थ हे असे प्राणीजन्य पदार्थ आहेत, ज्यांना कोणत्याही प्राण्याला मारायचे नाही, त्यामुळे ते मांसाहारी नसून शाकाहारी आहेत. पण यावर डॉ. सिल्व्हिया म्हणाल्या की, असे असेल तर कोंबड्या न मारता अंडी खाल्ली जातात, त्याला मांसाहारी का मानली जातात?'
दुधाचे मांसाहारी म्हणून वर्गीकरण करण्याच्या तिच्या दाव्यामुळे एक्सवर प्रतिक्रियेचा पाऊस पडत आहे. अनेकांनी चुकीची माहिती पसरवल्याबद्दल तिच्यावर टीका केली. सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांमुळे जगातील इतर भागांच्या तुलनेत भारतात 'शाकाहारी'ची व्याख्या लक्षणीय रीतीने भिन्न आहेत. सामान्यत: लॅक्टो-शाकाहाराचे अनुसरण करतात, म्हणजे ते डेअरी (दूध, पनीर, तूप, दही इ.) खातात. परंतु, अंडी टाळतात.
बहुतेक पाश्चिमात्य देशांमध्ये, शाकाहारी या शब्दात ओव्हो-लॅक्टो शाकाहारी म्हणजे दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी खाणारे लोक समाविष्ट आहेत. काही देशांमध्ये लोक मासे आणि सीफूड खातात, परंतु कोंबडीसारखे मांस टाळतात. त्या देशात सीफूडला शाकाहारी मानले जाते.
संबंधित बातम्या