Indian Coast Guard Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. केवळ मुलांसाठी ही भरती आहे. या साठी येत्या ८ सप्टेंबर पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही संधी नाविक (जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक शाखा) आणि यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) शाखांसाठी केली जाणार आहे. दहावी आणि १२ वी पास विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत.
भारतीय तटरक्षक दलातील या जागांसाठी काम करणारे इच्छुक ०८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत www.indiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भारतीय तटरक्षक दल एकूण ३५० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवणार आहे. या साठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवार पात्र ठरल्यानंतर त्याला भरती करून घेतले जाणार आहे.
इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ही एक सशस्त्र सेना आहे. तटरक्षक दल भारताच्या सागरी हितांचे संरक्षण करते आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी देखील करते. भारतीय तटरक्षक दलाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.indiancoastguard.gov.in वर बॅच 01/2024 साठी भरल्या जाणाऱ्या नाविक आणि यांत्रिक पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना ४ सप्टेंबर रोजी काढण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ८ सप्टेंबरपासून राबविली जाणार आहे. तर नोंदणी करण्याची अंतिम तारीख ही २२ सप्टेंबर आहे.
या साठी नाविक पदासाठी २१ हजार ७०० तर यांत्रिक पदासाठी २९२०० हा मुळ पगार दिला जाणार आहे. भारतीय तटरक्षक दलाने नाविक (जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक शाखा), आणि यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) पदांसाठी देखील भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ३५० रिक्त जागांपैकी २९० रिक्त पदे नाविक (जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक शाखा) आणि ६० यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) शाखेसाठी आहेत.
उमेदवारांना अर्ज शुल्क रुपये भरावे लागतील. सर्व सामान्य वर्गांसाठी ३०० तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. हे पैसे नेट बँकिंग वापरून किंवा Visa/Master/Maestro/Rupay क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI वापरून ऑनलाइन मोडद्वारे भरता येऊ शकतात. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थल www.joinindiancoastguard.gov.in यावर या बाबत सर्व तपशील देणहयात आले आहेत.
या संकेत स्थळावरू जाऊन Navik (जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक शाखा), आणि यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)} या पोस्टवर क्लिक करा.
यानंटर ‘मी सहमत आहे’ या बटणावर क्लिक करा आणि ‘ऑनलाइन अर्ज’ तुमच्या समोर येईल होईल.
अर्ज भरण्यासाठी पुढे जा आणि फोटो आणि स्वाक्षरी jpeg फॉरमॅटमध्ये अपलोड करा (प्रतिमा गुणवत्ता २०० dpi). छायाचित्र आणि स्वाक्षरीचा आकार अनुक्रमे १० kb ते ४० kb आणि १० kb ते ३० kb दरम्यान असावा.