मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  12th Pass Job: बारावी पास उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी, 'या' पदांसाठी होणार भरती

12th Pass Job: बारावी पास उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी, 'या' पदांसाठी होणार भरती

Feb 05, 2024 02:14 PM IST

Indian Coast Guard Recruitment 2024: भारतीय तटरक्षक दलात बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली.

Jobs 2024
Jobs 2024 (HT)

Indian Coast Guard Navik GD Recruitment 2024: बारावी पास उमेदवारांसाठी उमेदवारांसाठी नोकरी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी अर्ज मागिवण्यात आले. या भरतीद्वारे २६० पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार येत्या १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ५.३० वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

अधिसूचनेनुसार, अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये घेतली जाईल. भारतीय तटरक्षक खलाशी जीडी भरतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी नियुक्ती केली जाईल. भरतीद्वारे उत्तर विभागात ७९, पश्चिम विभागात ६६ पदे, ईशान्य विभागात ६८ पदे, पूर्व विभागात ३३ पदे, वायव्य विभागात १२ पदे, अंदमानमध्ये ०३ पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

अर्ज शुल्क

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क ३०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या पदासाठी उमेदवारांचे वय १८ ते २२ वर्ष असणे आवश्यक आहे. अर्जदारांचा जन्म ०१ सप्टेंबर २००२ ते ३१ ऑगस्ट २००६ दरम्यान झालेला असावा. ओबीसी आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

निवड प्रक्रिया

संगणक आधारित परीक्षा, मूल्यांकन चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेनंतर भारतीय तटरक्षक खलाशी भरती 2024 साठी उमेदवारांची निवड केली जाते.

ICMR Recruitment 2024: आयसीएमआरमध्ये वैज्ञानिक पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

 

अर्ज कसा करायचा?

- सर्व प्रथम भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.

- यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.

- वैयक्तिक माहिती भरा आणि सबमिट करा.

- यानंतर आयडी आणि पासवर्ड तयार करा आणि लॉग इन करा.

- पुढे फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

- यानंतर फॉर्म सबमिट करा.

आता फॉर्मची एक कॉपी डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर