पदवीधरांना नोकरीची संधी! इंडियन बँकेत ३०० जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? वाचा!-indian bank recruitment 2024 vacancy for 300 posts see eligibility criteria and last date of application ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पदवीधरांना नोकरीची संधी! इंडियन बँकेत ३०० जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? वाचा!

पदवीधरांना नोकरीची संधी! इंडियन बँकेत ३०० जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? वाचा!

Aug 26, 2024 10:22 AM IST

Indian Bank Recruitment : सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या इंडियन बँकेत ३०० जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदवीधरांना नोकरीची संधी! इंडियन बँकेत ३०० जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? वाचा!
पदवीधरांना नोकरीची संधी! इंडियन बँकेत ३०० जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? वाचा!

Indian Bank Recruitment : पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन बँकेनं लोकल बँक ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत इंडियन बँकेत ३०० पदे भरण्यात येणार आहेत.

सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर आहे.

राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील

महाराष्ट्र : ४० पदे

गुजरात : १५ पदे

कर्नाटक : ३५ पदे

तामिळनाडू / पुद्दुचेरी : १६० पदे

आंध्र प्रदेश व तेलंगणा : ५० पदे

वयोमर्यादा - उमेदवाराचं वय २० ते ३० वर्षे असावं. राखीव प्रवर्गाला वरच्या वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.  

शैक्षणिक पात्रता - पात्र उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून किमान उत्तीर्ण गुणांसह पदवीधर असावा. उमेदवाराकडं वैध गुणपत्रिका/ प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. पदवी/प्रमाणपत्र आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत अधिसूचना पहा.  

अर्ज शुल्क - सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १००० रुपये आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करून पेमेंट करता येणार आहे. ऑनलाइन पेमेंटसाठीचे व्यवहार शुल्क असल्यास ते उमेदवाराला भरावं लागेल.

निवड प्रक्रिया - या भरती मोहिमेत उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. प्राप्त अर्जांच्या संख्येच्या आधारे बँक आपल्या निवडीच्या पद्धतीबाबत अंतिम निर्णय घेईल. परीक्षा किंवा मुलाखतीसाठी कॉल लेटर उमेदवारांना ईमेल किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारेच दिले जातील. ही परीक्षा २०० गुणांची आणि मुलाखत १०० गुणांची असेल.

अर्ज कसा करावा?

indianbank.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. 

होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा

त्यानंतर स्थानिक बँक अधिकाऱ्याच्या अर्ज लिंकवर क्लिक करा

स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. आपला नोंदणी फॉर्म भरा 

अर्ज शुल्क भरा.

सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म सबमिट करा

भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

इंडियन बँक लोकल बँक ऑफिसर भरती २०२४ शी संबंधित इतर माहितीसाठी, अधिकृत वेबसाइट indianbank.in भेट द्या.