Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी; लोकल बँक ऑफिसर पदांसाठी मागवले अर्ज, महाराष्ट्रात 'इतक्या' जागा!-indian bank local bank officers recruitment 2024 apply for 300 posts link here ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी; लोकल बँक ऑफिसर पदांसाठी मागवले अर्ज, महाराष्ट्रात 'इतक्या' जागा!

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी; लोकल बँक ऑफिसर पदांसाठी मागवले अर्ज, महाराष्ट्रात 'इतक्या' जागा!

Aug 14, 2024 07:37 PM IST

Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँक लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

इंडियन बँकेत नोकरीची संधी
इंडियन बँकेत नोकरीची संधी

Bank Job: इंडियन बँकेने (Indian Bank) लोकल बँक ऑफिसर पदांसाठी (Local Bank Officers Recruitment) अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार indianbank.in येथे इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती  मोहिमेत संस्थेतील ३०० पदे भरण्यात येणार आहेत. नोंदणी प्रक्रिया १३ ऑगस्टपासून सुरू झाली असून २ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालणार आहे.  या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या भरतीसाठी तामिळनाडू/ पुद्दुचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरातमधील उमेदवार अर्ज करू शकतात. तामिळनाडू/ पुद्दुचेरी येथे सर्वाधिक १६० रिक्त जागा आहेत. तर,  कर्नाटक- ३५, आंध्र प्रदेश व तेलंगणा- ५०, महाराष्ट्र-४० आणि गुजरात येथे १५ रिक्त जागा आहेत.

इंडियन बँक नोकरी: पात्रता निकष

शासनाने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता. उमेदवाराकडे नोंदणीच्या दिवशी पदवीधर असल्याचे वैध मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि ऑनलाइन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शविणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षादरम्यान असावे.

इंडियन बँक नोकरी: निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत अर्जांची शॉर्टलिस्टिंग आणि त्यानंतर मुलाखत किंवा लेखी/ ऑनलाइन चाचणी आणि त्यानंतर मुलाखतीचा समावेश असेल. प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार, बँक आपल्या विवेकानुसार निवडीच्या पद्धतीचा निर्णय घेईल. परीक्षा/ मुलाखतीसाठी कॉल लेटर उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारेच जारी केले जातील. ही परीक्षा २०० गुणांची असेल आणि मुलाखत १०० गुणांची असेल.

इंडियन बँक नोकरी: अर्ज शुल्क

सर्व उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी १७५/- रुपये (केवळ सूचना शुल्क) आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करून स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन पेमेंट केले जाऊ शकते. ऑनलाइन पेमेंटसाठी ट्रान्झॅक्शन चार्जेस असतील तर ते उमेदवारांना द्यावे लागतील. अधिक माहितीसाठी उमेदवार इंडियन बँकेची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात नोकरी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार rbi.org.in येथे आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील ९४ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.