मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत १५०० पदांसाठी भरती; संधी चुकवू नका, लगेच करा अर्ज!

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत १५०० पदांसाठी भरती; संधी चुकवू नका, लगेच करा अर्ज!

Jul 10, 2024 04:49 PM IST

Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकेत एकूण १५०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

इंडियन बँकेत १५०० पदांसाठी भरती
इंडियन बँकेत १५०० पदांसाठी भरती

Indian Bank Apprentice Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेने शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज मागिवले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण १५०० पद भरली जाणार आहेत. तरुण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणे, असा या भरती मोहिमेचा उद्देश आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

इंडियन बँकने आज (१० जुलै २०२४) त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.indianbank.in वर १५०० शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसंदर्भात एक अधिसूचना जारी केली. इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दरम्यान, ३१ जुलै २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडियन बँकेची ही भरती मोहीम तरुण पदवीधरांना बँकिंग क्षेत्रातील मौल्यवान अनुभव मिळविण्याची महत्त्वपूर्ण संधी देते.

ट्रेंडिंग न्यूज

वय आआणि शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. एससी/एसटी/ओबीसी/पीडब्लूबीडी श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी ३१.०३.२०२० नंतर त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.

निवड प्रक्रिया

सर्वात प्रथम उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा होईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पुढे उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. हे तीन टप्पे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची इंडियन बँकेत शिकाऊ म्हणून निवड केली जाईल. हे तीन टप्पे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची इंडियन बँकेत शिकाऊ म्हणून निवड केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत

- सर्वप्रथम उमेदवारांनी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in वर भेट द्यावी.

- पुढे लॉगिन सेक्शनच्या खाली दिलेल्या रजिस्ट्रेशन केलेल्या लिंकवर क्लिक करा.

- रजिस्टर केल्यानंतर अर्ज प्रक्रियेला सुरुवात करा.

- अर्जात दिलेल्या कागदपत्रे अपलोड करावी.

- अर्ज शुल्क भरा

- अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्यावी.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर