third world war prediction : जगात सध्या दोन मोठे युद्ध सुरू आहे. एक तर रशिया यूक्रेन आणि दुसरे इस्राइल आणि हमास युद्ध. दरम्यान, इस्रायलचे आता शेजारी लेबनॉन आणि इराणशी देखील वाद उफाळून आला आहे. नुकतेच इस्रायलने तेहरानमध्ये घुसून सर्वात शत्रू हमास कमांडर इन चीफ इस्माईलला हनियेला ठार मारले. दरम्यान, आता इराण या घटनेचा बदला घेण्याच्या तयारीत आहे. अयातुल्ला खामेनी यांनीही आपल्या सैनिकांना इस्रायलवर हल्ला करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. या सोबतच काही मुस्लिम राष्ट्र इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धकडे वाटचाल करत असल्याचं अनेकांचं मत आहे.
अमेरिकेनेही इस्रायलला पाठिंबा दिला असून त्यांनी देखील अमेरिकन लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जगावर आणखी एका महायुद्धाचा धोका निर्माण होत असताना, 'भारतीय नॉस्ट्राडेमस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिषाने तिसऱ्या महायुद्ध कधी होणार यांचा अंदाज वर्तवला आहे. कुशल कुमारअसे या ज्योतिषाचे नाव आहे. त्याने थेट युद्ध कधी होईल आणि जगाचा अंत कधी होईल याची तारीख सांगितली आहे.
कुशल कुमार हे भारतातील प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. कुशल कुमारचे फॉलोर त्याला 'इंडियन नॉस्ट्राडेमस' म्हणतात. ४ किंवा ५ ऑगस्टला तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते, असा अलीकडचा इशारा त्यांनी दिला. मात्र, याआधी कुशल कुमारनेही तिसऱ्या महायुद्धाबाबत दोन भविष्यवाणी केल्या होत्या. यापूर्वी त्याने १८ जूननंतर कधीही युद्ध होऊ शकते असा दावा केला होता. त्यानंतर तिसऱ्या महायुद्धाची तारीख २६ किंवा २८ जुलै असण्याची शक्यत व्यक्त केली होती. आता कुशल कुमारने तिसऱ्यांदा भाकीत केले आहे. कुशलच्या मते आज ५ ऑगस्टला युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. ज्याचा प्रभाव संपूर्ण जगावर दिसेल.
कुशल कुमार याने या पूर्वीही अनेक अंदाज वर्तवले आहेत. त्याने यापूर्वी इस्रायल-हमास युद्ध आणि रशिया-युक्रेन युद्धाचा अचूक अंदाज वर्तवला होता. कुशलने दावा केला होता की जमिनीच्या मुद्यावरून या दोन्ही देशात संघर्ष होईल व लाखो लोकांचा जीव जाईल. त्याचा हा अंदाज खरा ठरला आहे.
लिंक्डइन प्रोफाइल नुसार कुशल कुमार मूळचा पंचकुला, हरियाणाचा आहे आणि तो एक प्रसिद्ध ज्योतिष व लेखक आहे. ज्योतिषशास्त्रावरील त्यांचे लेख कॅलिफोर्नियातील 'द माउंटन ॲस्ट्रॉलॉजी' (TMA) आणि न्यूयॉर्कमधील 'होरोस्कोप' या जगातील आघाडीच्या ज्योतिष मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. कुशल कुमार हे वैदिक ज्योतिषशास्त्रासह अर्थव्यवस्था, हवामान, व्यवसाय, रणनीती, युद्ध आणि जागतिक घडामोडी यांसारख्या क्षेत्रात भविष्यातील वक्ता आहेत. ते लोकांचे भविष्य देखील त्यांच्या जन्मवेळेच्या तपशीलावर आधारित सांगतात.