Trending news : एका मिनिटात ३५ पुल-अप्स, भारतीय सैनिकाचा फिटनेस पाहून नेटकरी आश्चर्यचकीत; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending news : एका मिनिटात ३५ पुल-अप्स, भारतीय सैनिकाचा फिटनेस पाहून नेटकरी आश्चर्यचकीत; पाहा व्हिडिओ

Trending news : एका मिनिटात ३५ पुल-अप्स, भारतीय सैनिकाचा फिटनेस पाहून नेटकरी आश्चर्यचकीत; पाहा व्हिडिओ

Updated Jul 01, 2024 04:38 PM IST

Indian Soldiers Pull-ups Video: भारतीय लष्करातील मेजर जनरल प्रसन्न जोशी यांच्या फिटनेसचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय सैनिकांच्या फिटनेसचा व्हिडिओ व्हायरल
भारतीय सैनिकांच्या फिटनेसचा व्हिडिओ व्हायरल

Indian Army Viral Video: मेजर जनरल प्रसन्न जोशी यांचा एका मिनिटात २५ पुल-अप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मेजर जनरल जोशी यांचा फिटनेस आणि क्षमता पाहून असंख्य लोक आश्चर्यचकीत झाले.

लेफ्टनंट कर्नल जे. एस. सोढी यांनी एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "भारतीय लष्कराचे मेजर जनरल प्रसन्न जोशी यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला सलाम आणि आदर. ऑक्टोबर 2022 मध्ये जर्मन प्रकाशन स्टॅटिस्टाने भारतीय सैन्याला जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ दल म्हणून मानांकन दिले आहे. भारतीय सेनेचा अभिमान आहे. जय हिंद."

या क्लिपमध्ये मेजर जनरल जोशी लष्कराच्या इतर जवानांसोबत जिममध्ये दिसत आहेत. ते पुल- अप करताना इतर जवान त्यांच्यासाठी काउंटडाऊन करत आहे. व्हिडिओच्या शेवटी जिममधील सर्वजण मेजर जनरल जोशी यांचे कौतुक करतात आणि त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या समर्पणाचे कौतुक करतात.

हजारो लोकांनी पाहिला व्हिडिओ

हा व्हिडिओ २९ जून रोजी शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून त्याला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टला चार हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून ही संख्या वाढतच चालली आहे. या शेअरवर असंख्य कमेंट्सही येत आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

एका व्यक्तीने लिहिले आहे की, “पार्कमध्ये फिरण्यासारखे २५ पुल- अप केल्यानंतरही त्यांनी आपला युनिफॉर्म शर्ट व्यवस्थित ठेवला आहे.”  दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, “एकदम सुंदर. खरा फिटनेस असाच दिसतो. खऱ्या हिरोंना सलाम.” "एकदम भारी. जे लोक सर्वात कठीण काळात आणि परिस्थितीत लढण्याचे धैर्य ठेवतात, त्यांची गोष्टच निराळी असते. भारतीय लष्कराचे अभिनंदन,' अशी कंमेट तिसऱ्याने केली. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, "एका मेजर जनरलसाठी २५ पुल-अप कौतुकास्पद आहेत. त्यांना फिटनेसची आवड असू शकते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर