Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात घुसून ध्वस्त केले दहशतवादी अड्डे, लष्कराने जारी केला ॲक्शन VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात घुसून ध्वस्त केले दहशतवादी अड्डे, लष्कराने जारी केला ॲक्शन VIDEO

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात घुसून ध्वस्त केले दहशतवादी अड्डे, लष्कराने जारी केला ॲक्शन VIDEO

Published May 07, 2025 03:58 PM IST

operation sindoor : ऑपरेशन सिंदूरदरम्यान लष्कराने राफेल विमानांच्या माध्यमातून SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांचा वापर करून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. लष्कराने या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला आहे.

भारतीय लष्कराने जारी केला ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ
भारतीय लष्कराने जारी केला ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ

Operation Sindoor Video : भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. २६ मिनिटांत पूर्ण झालेल्या या मोहिमेत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या अतिरेकी संघटनांच्या प्रमुख प्रशिक्षण तळांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय लष्कराने या ऑपरेशनचा ३४ सेकंदाचा व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात लष्कराची ताकद दिसत आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांनी SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांचा वापर करून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये जवळपास ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे, तर पाकिस्तानने २६ नागरिक ठार तर ४६ जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने या हल्ल्यांना 'युद्ध कृत्य' असे संबोधले असून प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

ऑपरेशन सिंदूर ही भारताची आतापर्यंतची सर्वात समन्वित आणि सर्वसमावेशक लष्करी कारवाई मानली जाते, ज्यात तिन्ही सेनांनी (लष्कर, हवाई आणि नौदल) भाग घेतला होता. ६-७ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण तळांवर ही कारवाई करण्यात आली.

दहशतवादी संघटना आणि त्यांचे तळ जे उध्वस्त झाले -

जैश-ए-मोहम्मद-

बहावलपूर येथील जैशचे मुख्यालय मार्कज सुब्हान अल्लाह या तळाला निशाणा बनवण्यात आले. येथे वरिष्ठ कमांडर्सच्या बैठका आणि प्रशिक्षण सत्रे होत होती. याशिवाय कोटली येथे मरकज अब्बास उद्ध्वस्त करण्यात आला. आत्मघातकी हल्लेखोरांचे हे प्रशिक्षण केंद्र होते. शस्त्रसाठा आणि वाहतुकीचे ही केंद्र होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तेरा कलानच्या सरजाल येथील नव्याने भरती झालेल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरालाही लक्ष्य करण्यात आले.

लष्कर-ए-तोयबा

२०० एकड क्षेत्रात पसरलेल्या लष्कराच्या सर्वात लॉजिस्टिक्स सेंट मार्कज तैयबा, मुरिदके याला निशाणा बनवण्यात आले. सेंट मरकज तैयबा, मुरीदके या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा दहशतवादी अजमल कसाब सारख्या दहशतवाद्यांचे हे प्रशिक्षण केंद्र आहे. याशिवाय लष्कराचे प्रादेशिक लॉजिस्टिक हब मरकज अहले हदीस, बरनाला उद्ध्वस्त करण्यात आले. लष्कर-जैश आणि लष्कर-जैश या दोन्ही संघटनांकडून वापरल्या जाणाऱ्या मुजफ्फराबाद येथील शवाई नाला कॅम्पला आणि घुसखोरांच्या सामरिक तळालाही लक्ष्य करण्यात आले.

हिज्बुल मुजाहिदीन -

सियालकोटमध्ये महमूना जोया ध्वस्त करण्यात आले. हिजबुलच्या या केंद्राचा वापर आजही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. काश्मीर खोऱ्यात नेटवर्क राखण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या दहशतवाद्यांचा हा तळ आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर