भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आता स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरचा आज समावेश करण्यात आला. तब्बल १० लाइट कॉम्बैट हेलिकॉप्टर्स हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हवाई दलाल सुपूर्त करण्यात आले. हेलिकॉप्टरचा हा ताफा भारतीय हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. या सोबतच पाकिस्तान आणि चीन सीमेवर काही क्षणात शत्रूचा खात्मा करण्यासही हे देशी हेलिकॉप्टर सक्षम आहेत. वजनाने हल्के असल्याच्या कारणाने लष्कर देखील दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे हे सीमेवर नेऊन काही वेळातच शत्रूचा नायनात करू शकणार आहेत. या हेलिकॉप्टरला उंच पर्वतरंगांमध्ये हल्ला करण्याच्या दृष्टीने बनवण्यात आले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल वीआर चौधरी यांच्या उपस्थितीत हे १० लाइट कॉम्बैट हेलिकॉप्टर्स जोधपुर येथे एका कार्यक्रमात हवाई दलाला हस्तांतरित करण्यात आले. लाइट कॉम्बैट हेलिकॉप्टर्स हे भारताच्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे बनविण्यात आले आहे. उंच पर्वत रांगात हल्ला करण्याच्या दृष्टीने हे हेलिकॉप्टर तयार करण्यात आले आहेत. ही विमाने अशा ठिकाणी वापरली जाणार आहे, ज्या ठिकाणी लढाऊ विमाने वापरली जाऊ शकत नाहीत.
सीमेवरील शत्रूला भरणार धडकी
हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एलसीएच 'एडवांस लाइट हेलिकॉप्टर' ध्रुव या हेलिकॉप्टर सारखेच आहे. यात शत्रूच्या रडार पासून वाचण्यासाठी 'स्टील्थ' (राडार से बचने की) यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच बख्तरबंद सुरक्षा प्रणाली, रात्री हल्ला करण्याची क्षमता आणि आपत्कालीन स्थितित स्वत:ची सुरक्षा करण्याची क्षमता देखील या विमानात आहे. यामुळे रात्री देखील शत्रूचा शोध घेत त्यांना मारण्याची क्षमता देखील या हेलिकॉप्टरमध्ये आहे.
१० हवाई दलाकडे आणि ५ हेलिकॉप्टर होणार लष्कराच्या ताफ्यात सामील
तब्बल ५.८ टन वाजनाचे असलेले तसेच दोन इंजन असेलेले हे लाइट कॉम्बैट हेलिकॉप्टर्स अनेक आधुनिक शस्त्रास्त्र प्रणालीने सज्ज करण्यात आले आहे. या सर्व शस्त्रास्त्र प्रणालीचे परीक्षण या पूर्वी करण्यात आले आहे. यापूर्वी मार्च महिन्यात प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटी (सीसीएस)ने तब्बल ३ हजार ८८७ कोटी रुपय खर्चून १५ स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरची खरेदी करण्यास मंजूरी दिली होती. रक्षा मंत्रालयने दिलेल्या माहितीनुसार १० हेलीकॉप्टर हे भारतीय हवाई दलात आणि ५ हे भारतीय लष्करात सामील होणार आहे.
संबंधित बातम्या