एअरफोर्समधील महिला अधिकाऱ्याकडून विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप; खोलीत बोलावले अन्-indian air force women officer accuses wing commander of rape ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एअरफोर्समधील महिला अधिकाऱ्याकडून विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप; खोलीत बोलावले अन्

एअरफोर्समधील महिला अधिकाऱ्याकडून विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप; खोलीत बोलावले अन्

Sep 10, 2024 09:01 PM IST

Air force - भारतीय हवाई दलाच्या एका महिला फ्लाइंग ऑफिसरने विंग कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

एअरफोर्समधील महिला अधिकाऱ्याकडून विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप
एअरफोर्समधील महिला अधिकाऱ्याकडून विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप

भारतीय हवाई दलाच्या एका महिला फ्लाइंग ऑफिसरने विंग कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणात जम्मू काश्मीरमधील बडगाम शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बडगाम येथे कार्यरत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवाई दलात श्रीनगर येथे कार्यरत एका महिला फ्लाइंग ऑफिसरने त्याच हवाई स्टेशनवर कार्यरत विंग कमांडर दर्जाच्या एका अधिकाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. कायद्याच्या संबंधित कलमान्वये विंग कमांडरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भारतायी हवाई दलाकडून याप्रकरणी प्रतिक्रिया आली आहे. ‘आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे. जम्मू काश्मीरमधील बडगाम पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर श्रीनगरच्या एअरफोर्स स्टेशनशी संपर्क साधला होता. आम्ही या प्रकरणात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत आहोत’ अशी प्रतिक्रिया भारतीय हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्याने आरोप काय केला?


एअरफोर्समध्ये कार्यरत महिला अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ती या स्टेशनवर कार्यरत विंग कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्याकडून गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ सहन करत होती, असं वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ३१ डिसेंबर २०२३च्या रात्री ऑफिसर्स मेसमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी सुरू असताना या विंग कमांडरने तिला गिफ्ट मिळाले का, अशी विचारणा केली. महिला अधिकाऱ्याने नकारार्थी उत्तर कळवल्यानंतर विंग कमांडरने तिला गिफ्ट खोलीत ठेवले असल्याचे सांगून येऊन घेऊन जा असं सांगितलं. ते दोघे खोलीत गेले असता तिचा वरिष्ठ असलेल्या विंग कमांडर अधिकाऱ्याने तिच्यासोबत जबरदस्तीने ओरल सेक्स करून तिचा विनयभंग केला, अशी तक्रार या महिला अधिकाऱ्याने केली आहे. या घटनेनंतर अधिकाऱ्याला हे सर्व थांबवण्याचं महिला अधिकाऱ्याने सांगितलं. आणि तिने अधिकाऱ्याला धक्का देऊन तेथून पळून गेली. या घटनेनंतर महिला अधिकारी कार्यालयात गेली तेव्हा विंग कमांडरने जणू आदल्या रात्री काही घडलंच नाही असे वर्तन केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 

हे वाचाः पतीला इंस्टाग्राम, फेसबुक चालवायला येत नव्हते, मॉडर्न पत्नीने ‘रीलबाज’ दीराशी अवैध संबंध ठेऊन पतीला संपवलं

पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी तिला इतर दोन महिला अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले होते, असं पीडितेने सांगितलं. कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु चौकशी समितीने जबाब नोदवण्यासाठी या पीडित महिला अधिकारी आणि आरोपी विंग कमांडरला एकत्रित बसवले होते. यावर महिला अधिकाऱ्याने आक्षेप घेतला होता. नंतर प्रशासनाच्या चुका लपवण्यासाठी तपासच बंद करण्यात आल्याचा दावा या पीडित महिला अधिकाऱ्याने केला आहे.

Whats_app_banner