Tejas MK1A : जुलै २०२४ पर्यंत भारतीय हवाई दलाला तेजस MK-1A या लढाऊ विमानांची पहिली खेप मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे निर्मित तेजस हलके लढाऊ विमान (LCA) MK-1A ने २८ मार्च रोजी बेंगळुरू येथे पहिले उड्डाण केले. हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एचएएलला ९७ हलके लढाऊ विमान तेजसच्या खरेदीसाठी निविदा जारी केली होती. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तान आणि चीनला धडकी भरणार आहे. सुमारे ६७ हजार कोटी रुपयांची निविदा सरकारने एचएएलला दिली आहे. गेल्या महिन्यात हवाई दलाच्या बैठकीत भारतीय हवाईदळासाठी आणखी तेजस एमके-१ए लढाऊ विमानांच्या गरजेवर भर देण्यात आला होता.
याआधी फेब्रुवारी २०२१ मध्ये हवाई दलाने ४८,००० कोटी रुपयांची ऑर्डर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला दिली आहे. या निविदेनुसार 83 MK-1A लढाऊ विमानांची ऑर्डर देण्यात आली होती. विमान खरेदीसाठी नुकतीच काढण्यात आलेली निविदा हा या संदर्भातला दुसरी महत्वाची घटना मानली जाते. या कारारा अंतर्गत ८३ लढाऊ विमानांची पहिली तुकडी ३१ मार्चपर्यंत हवाई दलाला दिली जाणार होती, परंतु मुख्य हवाई उड्डाण प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने डिलीव्हरी मिळण्यास विलंब झाला आहे. आता ही डिलिव्हरी जुलैमध्ये होणार आहे. आधीच ऑर्डर केलेल्या ८३ लढाऊ विमानांची संपूर्ण डिलिव्हरी ही २०२८ पर्यंत पूर्ण होणे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला अपेक्षित आहे.
लढाऊ विमानांसाठी भारतीय हवाई दलाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, HAL ने LCA MK-1A साठी नाशिक येथे नवीन उत्पादन लाइन उभारली आहे. HAL दरवर्षी बेंगळुरूमध्ये 16 LCA Mk-1A ची निर्मिती करते आणि नाशिकमध्ये उत्पादन लाइन स्थापन केल्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड वर्षाला २४ जेट विमाने तयार करण्यास सक्षम असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की LCA Mk-1A ही LCA Mk-1 ची सुधारित आवृत्ती आहे, जी आधीच हवाई दलात समाविष्ट करण्यात आली आह. LCA येत्या दशकात आणि त्यानंतरच्या काळात भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शक्तीचा मुख्य कणा म्हणून उदयास येणार आहे.
MK-1A ही तेजस विमानाची अपग्रेडेड आवृत्ती आहे. त्यात अनेक आधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. या विमानात रडार वॉर्निंग रिसीव्हर, स्वसंरक्षणासाठी जॅमर पॉड आणि अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. हे विमान हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असेल. नावाप्रमाणेच हे विमान वजनाने हलके असेल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले हे विमान त्याच्या श्रेणीतील सर्वात हलके आणि जगातील सर्वात लहान मल्टी-रोल सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे.
भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. सुमारे LCA (Mk-1, Mk-1A आणि Mk-2 तेजसच्या आवृत्त्या) आपल्या देशाच्या हवाई दलात समाविष्ट करणे अपेक्षित आहे. त्यापैकी एक तृतीयांश विमानांची ऑर्डर आधीच करण्यात आली आहे. यातील काही विमानांने हवाईदलाल देण्यात देखील आले आहेत. आगामी काळात हवाई दलाला अधिक आधुनिक बनवण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या