मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हवाई दलाचा मोठा पराक्रम ! कारगिल हवाई पट्टीवर रात्री हरक्यूलिस विमानाचे यशस्वी लँडिंग; पाहा व्हिडिओ

हवाई दलाचा मोठा पराक्रम ! कारगिल हवाई पट्टीवर रात्री हरक्यूलिस विमानाचे यशस्वी लँडिंग; पाहा व्हिडिओ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 07, 2024 02:07 PM IST

Indian air force : भारतीय हवाईदलाने मोठी कामगिरी केली आहे. रात्री पहिल्यांदाच IAF C-130J विमानाने कारगिल हवाई पट्टीवर नाईट लँडिंग केले. या सरावासासोबत गरुड कमांडो यांनी देखील शक्ति प्रदर्शन करत प्रशिक्षण मिशन पूर्ण केल

130 j aircraft executes night landing at kargil airstrip
130 j aircraft executes night landing at kargil airstrip

130 j aircraft executes night landing at kargil airstrip : रविवारी भारतीय हवाई दलाच्या (IAF) यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाने (IAF C-130 J) रात्रीच्या अंधारात कारगिल हवाई पट्टीवर यशस्वी नाइट लँडिंग केले. या यशवस्वी मोहिमेने आव्हानात्मक वातावरणात भारतीय हवाई दलाची अतुलनीय क्षमता दाखवली. या लँडिंगचा व्हिडिओ वायु दलाने ट्विटरवर शेअर करतलिहिले की, 'पहिल्यांदा IAF C-130 J विमानाने कारगिल एअरस्ट्रिपवर नाईट लँडिंग केले आहे. मार्गातील भूभाग कव्हर करून, या मोहिमेत गरुड कमांडोनी प्रशिक्षण मोहीम देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

या प्रशिक्षण मोहिमेबाबत हवाई दलाकडून अधिक माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, हवाईदलाने उत्तराखंडमधील एका छोट्या हवाई पट्टीवर दोन लॉकहीड मार्टिन C-130J-30 'सुपर हरक्यूलिस' लष्करी वाहतूक विमाने यशस्वीरित्या उतरवली होती. खरं तर, हे अभियान खराब हवामानातही बोगद्यात अडकलेल्या काही कामगारांना वाचवण्यासाठी अभियांत्रिकी उपकरणे वितरीत करण्यासाठी राबवण्यात आले होते.

Ram Lalla Idol : दिव्य तेज, कोमलता, ५१ इंच उंच तर वजन १.५ टन! खास आहे रामलल्लाचं मनमोहक बालस्वरुप

उल्लेखनीय आहे की, गेल्या महिन्यात तामिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यातील श्रीवेकुंतम रेल्वे स्थानकाला पुराचा तडाखा बसला होता. येथे तिरुचेंदूर-चेन्नई एग्मोर चेंदूर एक्स्प्रेस ट्रेन अडकली होती. यावेळी हवाई दलाने बचाव मोहीम राबवून दीड वर्षाच्या मुलासह त्याच्या गरोदर मातेसह ४ जणांना सुखरूप सुरक्षित स्थळी नेले होते. येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने एनडीआरएफसह बचाव पथक अडकलेल्या प्रवाशांपर्यंत पोहोचू शकले नव्हते.

राज्य सरकारने बचाव आणि मदत कार्यात हवाई दलाची मदत मागितली. दोन टन मदत सामग्री घेऊन हेलिकॉप्टरने सुलूर विमानतळावरून उड्डाण केले, अंधार आणि प्रतिकूल हवामानामुळे संध्याकाळी प्रतिसाद देऊ शकले नाहीत. सकाळी हवाई दलाची तीन हेलिकॉप्टर या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. प्रवाशांसाठी हेलिकॉप्टरमधून अन्नाची पाकिटे आणि पिण्याचे पाणी सोडण्यात आले.

WhatsApp channel

विभाग