DeepSeekला तगडं आव्हान देण्यासाठी येतयं भारताचं स्वत:चं AI मॉडेल! सरकारनं केली मोठी घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DeepSeekला तगडं आव्हान देण्यासाठी येतयं भारताचं स्वत:चं AI मॉडेल! सरकारनं केली मोठी घोषणा

DeepSeekला तगडं आव्हान देण्यासाठी येतयं भारताचं स्वत:चं AI मॉडेल! सरकारनं केली मोठी घोषणा

Jan 31, 2025 10:29 AM IST

India will develop own AI model like Deepseek : डीपसेकचे 'एआय असिस्टंट' हे अ‍ॅपलच्या आयफोन स्टोअरवर मंगळवारी दुपारी डाऊनलोड केले जाणारे नंबर वन फ्री अ‍ॅप ठरले. त्याच्या लाँचिंगमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात (वॉल स्ट्रीट) मोठी घसरण झाली.

DeepSeekला तगडं आव्हान देण्यासाठी येतयं भारताचं स्वत:चं AI मॉडेल! सरकारनं केली मोठी घोषणा
DeepSeekला तगडं आव्हान देण्यासाठी येतयं भारताचं स्वत:चं AI मॉडेल! सरकारनं केली मोठी घोषणा (REUTERS)

India will develop own AI model like Deepseek : भारत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीतआहे. या बाबतचे संकेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, भारत स्वतःचे जेनेरेटिव्ह एआय मॉडेल तयार करत आहे. जगात सध्या  डीपसीक या मेड इन चायना एआय मॉडेलची चर्चा होत असतांना भारताने देखील स्वत:च्या एआय मॉडेलबद्दल घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन भारतात या निमित्त येऊ शकतात, असे देखील वृत्त आहे.

उत्कर्ष ओडिशा कॉन्क्लेव्हदरम्यान वैष्णव यांनी या बाबत घोषणा केली. वैष्णव म्हणाले,  भारत स्वतःचे जेनेरेटिव्ह एआय मॉडेल तयार करत आहे. ओडिशामध्ये एआय डेटा सेंटर उभारण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. हे एआय कॉम्प्युट फॅसिलिटीद्वारे ऑपरेट केले जाईल. भारताची गरज लक्षात घेऊन एलएलएम (लार्ज लँग्वेज मॉडेल) विकसित करण्यासाठी १८,००० जीपीयू खरेदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

१८००० जीपीयूसह भारत देशाच्या भाषिक, आर्थिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करणारे स्वदेशी एआय मॉडेल लवकरच तयार करणार आहे. विशेष म्हणजे भारत सरकार आरोग्य सेवांपासून प्रशासन, शिक्षण आणि आर्थिक सेवांमध्ये देखील एआयच्या वापरावर भर देत आहे.

जगभरात डीपसीकच्या चर्चा  

डीपसीक ही २०२३ मध्ये स्थापन झालेली एक चिनी एआय कंपनी आहे. जानेवारी २०२५  मध्ये कंपनीने आपले नवीन मॉडेल, डीपसीक-आर १ बाजारात आणले होते. या अ‍ॅपने त्याच्या तार्किक क्षमतेसाठी सर्वांचे लक्ष वेधलं आहे.  डीपसेकचे 'एआय असिस्टंट' हे अ‍ॅपलच्या आयफोन स्टोअरवर मंगळवारी दुपारी डाऊनलोड केले जाणारे नंबर वन फ्री अ‍ॅप ठरले आणि या अ‍ॅपच्या लाँचिंगमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात (वॉल स्ट्रीट) देखील मोठी उलथा पालथ झाली होती.  

डीपसीकचे म्हणणे आहे की त्याचे एआय मॉडेल्स ओपनएआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या जेमिनीसारख्या अमेरिकन दिग्गज अ‍ॅपला तगडं आव्हान देणारं आहे. तसेच, डीपसीकचे एआय अ‍ॅप सर्वसामान्यांना परवडणारे आहे.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर