मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lakshadweep: लक्षद्वीपमध्ये होणार नवीन विमानतळ, फायटर जेट्सही असणार तैनात; काय आहे मोदी सरकारची योजना

Lakshadweep: लक्षद्वीपमध्ये होणार नवीन विमानतळ, फायटर जेट्सही असणार तैनात; काय आहे मोदी सरकारची योजना

Jan 09, 2024 08:10 PM IST

Lakshadweep Airport : लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर दुहेरी उद्देश्याने एअरफील्ड बनवले जाईल. येथून फायटर जेट्सचे संचालन होईल

Lakshadweep
Lakshadweep

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लक्षद्वीपबाबत नवीन योजना आखली आहे. भारत सरकार लक्षद्वीपमधील मिनिकॉय आयलँड्स (Minicoy Islands) वर नवीन विमानतळ बनवणार आहे. जेथून फायटर जेट्स, मिलिट्री एअरक्राफ्ट आणि कॉमर्शियल विमानांचे संचालन केले जाईल. येथे ड्यूल पर्पज एअरफील्ड (Dual Purpose Airfield) होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिनिकॉय बेटावर दुहेरी उद्देश्याने एअरफील्ड बनवले जाईल. येथून फायटर जेट्सचे संचालन होईल. त्याचबरोबर सामान्य नागरिकही विमान प्रवास करू शकतील. त्याचबरोबर अन्य मिलिट्री एअरक्राफ्टची लँडिंग आणि टेकऑफ होईल. 

यापूर्वी केवळ लष्करी वापरासाठी एअरफील्ड बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे होता. मात्र आता त्याला अपग्रेड करून दुहेरी उद्देश्याने एअरफील्ड बनवले जाईल. याच्या माध्यमातून भारत अरबी समुद्र व हिंदी महासागरात चारी बाजुला करडी नजर ठेऊ शकतो. समुद्री चाच्यांच्या कृत्यांनाही पायबंद घातला जाऊ शकतो. 

हवाई दल करणार एअरफील्डचे संचालन -

नौदल व हवाई दलासाठी हिंदी महासागर व अरबी समुद्रात ऑपरेशन करणे सुलभ होईल. त्याचबरोबर चीनच्या वाढत्या कुरापतींवर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळेल. मिनिकॉय आइलँडवर एअरस्ट्रिप बनवण्याचा प्रस्ताव सर्वात आधी भारतीय तटरक्षक बल (Indian Coast Guards) ने दिला होता. याचे संचालन हवाई दल करणार आहे. 

लक्षद्वीपच्या जवळ सध्या केवळ एकच एअरस्ट्रिप आहे. ही अगाती आयलँडवर आहे.  येथे सर्व प्रकारच्या विमानांचे लँडिंग होऊ शकते.

नौदल आधीपासून मजबूत आता हवाई दलाची तयारी -

लक्षद्वीपच्या कवरत्ती आयलँड ( Kavaratti Island) वर भारतीय नौदलाचा INS Dweeprakshak नौसैनिक बेस आहे. येथे भारतीय नौदल आधीपासून मजबूत आहे. मात्र आता हवाई दलालाही मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टी-२० वर्ल्डकप २०२४