इस्रोनं स्पेसएक्सच्या रॉकेटने यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केला भारतीय उपग्रह जीसॅट-एन २; काय आहे कारण? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्रोनं स्पेसएक्सच्या रॉकेटने यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केला भारतीय उपग्रह जीसॅट-एन २; काय आहे कारण? वाचा

इस्रोनं स्पेसएक्सच्या रॉकेटने यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केला भारतीय उपग्रह जीसॅट-एन २; काय आहे कारण? वाचा

Nov 19, 2024 07:49 AM IST

spacex launched India ISRO satellite : ४७०० किलो वजनाचा जीसॅट-एन २ किंवा जीसॅट २० हा उपग्रह इस्रोने स्पेसएक्सच्या मदतीने आज यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केला आहे. या उपग्रहामुळे दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते. या उपग्रहाचा कार्यकाळ १४ वर्षे आहे.

इस्रोनं स्पेसएक्सच्या रॉकेटने यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केला भारतीय उपग्रह जीसॅट-एन २; काय आहे कारण? वाचा
इस्रोनं स्पेसएक्सच्या रॉकेटने यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केला भारतीय उपग्रह जीसॅट-एन २; काय आहे कारण? वाचा (AFP)

spacex launched India ISRO satellite : भारताचा सर्वात प्रगत संचार उपग्रह जीसॅट-एन२ अंतराळात प्रक्षेपित करणीय आला आहे.   विशेष म्हणजे इस्रोचा म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा हा उपग्रह अब्जाधीश एलन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटच्या मदतीनं प्रक्षेपित करण्यात आला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून हा उपग्रह अंतराळात पाठवण्यात आला . या उपग्रहाच्या माध्यमातून भारताची दळणवळण यंत्रणा आणखी  मजबूत होईल, असे बोलले जात आहे. मात्र, इस्रोने हा उपग्रह स्पेसएक्सच्या रॉकेटने का प्रक्षेपित केला याची माहिती घेऊयात. 

हा उपग्रह तब्बल ४७००  किलो वजनाचा आहे.  जीसॅट-एन २  किंवा जीसॅट २० असे या उपग्रहाचे नाव आहे.  या उपग्रहाच्या मदतीने दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही वेगाने दिली जाऊ शकते. या उपग्रहाचे कार्यकाळ १४ वर्षांचा आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी या बाबत  माहिती दिली आहे. प्रक्षेपणाच्या वेळी ते म्हणाले, 'जीसॅट २० चे मिशन लाइफ १४ वर्षे असून उपग्रहाच्या मदतीसाठी जमिनीवरील पायाभूत सुविधा सज्ज करण्यात आल्या  आहेत.

सुमारे ३३ मिनिटांच्या उड्डाणानंतर एलन मस्क यांच्या मालकीच्या  स्पेसएक्सचे फाल्कन-९ रॉकेटच्या साह्याने  ४,७०० किलोचा जीसॅट-एन२ हा उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत (जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये) प्रक्षेपित करण्यात आला. केप कॅनाव्हेरल प्रक्षेपण स्थळी स्पेसएक्स आणि इस्रोचे शास्त्रज्ञ या विशेष व्यावसायिक मोहिमेत प्रक्षेपणावर लक्ष ठेवून होते.

इस्रोच्या एलएमव्ही-३ जीटीओ या रॉकेमध्ये ४,०००  किलो वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे   भारतीय अंतराळ संस्थेने अमेरिकेतून एलन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या फाल्कन-९  प्रक्षेपण यानाचा वापर करून हा ४७०० किलो वजनाचा उपग्रहक अवकाशात  प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला.  

न्यूस्पेस इंडिया लिमिटेडचे जीसॅट-२० हे जीसॅट मालिकेतील हा उपग्रह असून दळणवळण उपग्रह आहे.  भारताच्या स्मार्ट सिटी मिशनसाठी आवश्यक असलेल्या दळणवळण व पायाभूत सुविधांमध्ये डेटा ट्रान्समिशन क्षमता वाढवण्याचे या उपग्रहांच्या माध्यमातून इस्रोचे उद्दीष्ट आहे. सुमारे ६ किलोवॅट विजेची गरज भागविण्यासाठी इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीमची रचना या उपग्रहात करण्यात आली आहे. या उपग्रहात सन सेन्सर, अर्थ सेन्सर, इनर्शियल रेफरन्स युनिट आणि स्टार सेन्सर देखील बसवण्यात आले आहेत.

इस्रोला स्पेसएक्सची गरज का भासली ? 

 अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्सने मंगळवारी फ्लोरिडाच्या कॅनाव्हेरल स्टेशनवर भारताच्या जीसॅट-एन२ चे प्रक्षेपण केले. इस्रो आणि स्पेसएक्स यांच्यात अलीकडच्या काळात अनेक व्यावसायिक करार झाले आहेत. या करारानुसार स्पेसएक्सच्या रॉकेटद्वारे भारतीय उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.  एकाच वेळी शेकडो उपग्रह प्रक्षेपित करून जागतिक विक्रम करणाऱ्या इस्रोला उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी स्पेसएक्सची गरज कशी भासली, हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे.

जीसॅट-एन-२ हा इस्रोच्या सॅटेलाईट सेंटर आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरने संयुक्तपणे विकसित केलेला कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे.  जीसॅट मालिकेतील दळणवळण उपग्रह कार्यान्वित राहतील तसेच हे उपग्रह भारताच्या स्मार्ट सिटी मिशनसाठी आवश्यक मानला जात आहे. या उपग्रहामुळे  दळणवळणाच्या सुविधा आणखी सक्षम होणार आहे. डेटा ट्रान्समिशन क्षमतेत देखील वाढ होणार आहे.  ४८ जीबीपीएस डेटा ट्रान्समिशन क्षमतेसह, भारतातील ग्रामीण भागातही ब्रॉडबँड सेवा आणि इनफ्लाइट कनेक्टिव्हिटी या उपग्रहामुळे वाढणार आहे.  एकाधिक स्पॉट बीमचा वापर करून, जीसॅट-एन २  भारताच्या विविध भागात ब्रॉडबँड सेवांची कार्यक्षमता वाढवणार आहे.  

जीसॅट २० च्या प्रक्षेपणासाठी इस्रोने स्पेसएक्सची निवड का केली?

इस्रोला आपला उपग्रह जीसॅट-२० प्रक्षेपित करण्यासाठी ४ हजारा पेक्षा अधिक वजन वाहून नेणाऱ्या  रॉकेटची गरज होती. सध्या भारतातील सर्वात मोठे रॉकेट एलव्हीएम ३ ची पेलोड क्षमता ही  केवळ ४००० किलो ग्रॅम आहे, तर जीसॅट २० चे वजन सुमारे ४७०० किलो असल्याने इस्रोला हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटवरची मदत घ्यावी लागली.  

काय आहे फाल्कन ९ रॉकेट?

फाल्कन ९ रॉकेट हे स्पेसएक्सने बनवलेले पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट आहे. केवळ उपग्रहच नाही तर फाल्कनमधून लोकांनाही अंतराळात नेले जाऊ शकते. स्पेसएक्सच्या म्हणण्यानुसार, फाल्कन ९ हे जगातील पहिले पुन्हा वापरता येणारे प्रक्षेपक रॉकेट आहे. त्याच्या पुनरवापर क्षमतेमुळे कंपनीची मोठी आर्थिक बरीच बचत होते, ज्यामुळे कंपनीच्या सर्व प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.  

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर