मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सरकार पुन्हा घेणार निजामाच्या सोन्याच्या नाण्याचा शोध; तब्बल १२ किलोच नाण

सरकार पुन्हा घेणार निजामाच्या सोन्याच्या नाण्याचा शोध; तब्बल १२ किलोच नाण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 27, 2022 12:59 PM IST

निजामाच्या खजिन्यातील सर्वांत मोठ्या नाण्याचा भारत सरकारने पुन्हा शोध सुरू केला आहे. हे नाण १२ किलोचे असून संपूर्ण सोण्याचे आहे. हा शोध ३५ वर्षांपूर्वी थांबण्यिात आला होता.

Nizam Gold Coin
Nizam Gold Coin

हैद्राबाद : भारत सरकारने निजामाच्या खजिन्यातील जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या नाण्याचा शोध जवळपास ४ दशकानंतर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठे नाणे अशी याची ओळख आहे. हे नाणे १२ किलोचे असून संपूर्ण सोन्याचे आहे. हा अमुल्य खजिना असल्याचं केंद्राने म्हटले आहे. (Nizam’s treasure & world’s biggest gold coin)

हैदराबादचा आठवा निजाम मुकरराम जाह याच्या ताब्यात हे नाणे शेवटी होते. मुकर्रम जाह यांनी या नाण्याचा स्विस बँकेत लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ही नाणे गायब झाली होती. सीबीआयने या नाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. जाह यांचे आजोबा आणि हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्यामार्फत जाहला देण्यात आलेली नाणी शोधण्यात सीबीआय अपयशी ठरली होते.

सम्राट जहांगीरने पाडलेले नाणे शेवटच्या निजामाला वारसाहक्काने मिळाले होते. जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या नाण्याचा इतिहास आणि वारसा यावर संशोधन करणारे मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीच्या एचके शेरवानी सेंटर फॉर डेक्कन स्टडीजचे प्रख्यात इतिहासकार प्रोफेसर सलमा अहमद फारुकी म्हणाले एका वर्तमान पत्राशी बोलतांना म्हणाल्या की, हे नाणे अमूल्य असून हैदराबादचा अभिमान आहे. आता, ३५ वषार्नंतर हे नाणे शोधण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत.

१९८७ मध्ये युरोपातील भारतीय अधिका-यांनी पॅरिसस्थित इंडोसुएझ बँकेच्या जिनिव्हा शाखेच्या माध्यमातून ९ नोव्हेंबर रोजी हॉटेल मोगा येथे जिनिव्हा येथील ११,९३५.८ ग्रॅम सोन्याच्या नाण्याचा लिलाव करणारा हॅब्सबर्ग फेल्डमन एसएने केंद्र सरकारला इशारा दिला, तेव्हा सीबीआयने या प्रकारणाचा तपास सुरू केला होता. तपास सुरू झाल्यावर बरीच माहिती सापडली.

प्रोफेसर सलमा म्हणाल्या की, सीबीआयच्या अधिका-यांनी इतिहासकारांची भूमिका पार पाडली आणि नाण्यांच्या इतिहासाची निर्मिती केली. या तपासाचा भाग असलेले सीबीआयचे अनेक अधिकारी आता पदावर नाहीत, त्यामुळे हा शोध थांबला.

सीबीआयचे माजी सहसंचालक शांतोनू सेन यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, जहांगीरने अशी दोन नाणी पाडल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आढळले. एक इराणच्या शहाचा राजदूत यद्गर अली याच्यापुढे सादर करण्यात आला आणि दुसरा हैदराबादच्या निजामांची संपत्तीचा भाग होता.

प्रोफेसर सलमा म्हणाल्या की, १९८७ मध्ये अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील सीबीआय विशेष तपास युनिट इलेव्हनने पुरातन आणि कला खजिना कायदा, १९७२ अंतर्गत एफआयआर नोंदविला. पुढील तपासात असे दिसून आले आहे की, मुकरम जाह याने १९८७ मध्ये स्विस लिलावात दोन सोन्याच्या मोहोरांचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक १ हजार तोळ्याचे नाणे होते. १९८७ मध्ये त्याची किंमत १६० लाख डॉलर्स होती, असेही सलमा म्हणाल्या.

प्रोफेसर सलमा यांच्या म्हणण्यानुसार, १९८८ मध्ये मुकरम जाह यांनी ९० लाख स्विस फ्रँकचे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी हा लिलाव होणार होता. शांतोनू सेन यांच्या पुस्तकात असेही म्हटले आहे की, बँक आणि मुकरराम जाह यांच्यातील पत्रव्यवहारावरून हे स्पष्ट झाले आहे की, कॅरिबियनमधील क्रिस्टलर सर्व्हिसेस आणि स्टिमरीड कॉपोर्रेशन या त्यांच्या दोन कंपन्यांना शेतीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी कर्जाच्या बदल्यात दोन सोन्याची नाणी जिनिव्हा येथील बँकेला गहाण ठेवण्यात आली होती.

स्वित्झर्लंडच्या लिलावगृहात आलेल्या जहांगीरने काढलेल्या सोन्याच्या मोठ्या नाण्याचे काय झाले हे आता अनेक वर्षे उलटून गेली आहेत आणि कोणालाही माहिती नाही, असे सांगून त्यांनी आशा व्यक्त केली की, केंद्राच्या नव्या प्रयत्नांना यावेळी सकारात्मक परिणाम मिळू शकतील.

IPL_Entry_Point

विभाग