मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'एच३ एन२'चा धोका वाढतोय, १ जानेवारी ते २१ मार्चपर्यंत १,३१७ रुग्णांची नोंद; कोरोनाचंही जाळं पसरतंय
H3N2 Virus
H3N2 Virus

'एच३ एन२'चा धोका वाढतोय, १ जानेवारी ते २१ मार्चपर्यंत १,३१७ रुग्णांची नोंद; कोरोनाचंही जाळं पसरतंय

28 March 2023, 17:48 ISTAshwjeet Rajendra Jagtap

H3N2 Virus: देशात कोरोनाबाधित रुग्णांसह एच३ एन२ च्याही रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

H3N2 Virus Cases In India: देशातील अनेक राज्यांमध्ये H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या प्रकरणात झपाट्याने वाढत आहेत. याशिवाय, कोरोनाने पुन्हा डोके वर काढलंय. भारतात १ जानेवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत 'एच३ एन२ची १ हजार ३१७ प्रकरणे नोंदवली गेली, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

ट्रेंडिंग न्यूज

प्रवीण पवार यांनी लेखी उत्तरात सांगितले की, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयएमसीआरनुसार, गेल्या दोन महिन्यांत आयएलआय/ एसएआरआय यांच्या देखरेखीखाली नोंदवलेल्या ५१० 'एच३ एन२'च्या रुग्णांपैकी १९ रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता होती. आयसीएमआरच्या सर्वेक्षणानुसार, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये असलेल्या ५० टक्के 'एच३ एन२'च्या रुग्णांना दमाच्या त्रास होता.

पवार म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.'एच३ एन२' सह इन्फ्लूएंझा प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी राज्यांना मदत करण्यासाठी अनेक पावले उचलली. यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या संबंधित भागात नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशभरात एच३ एन२ आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा मास्क घालण्यास सुरुवात केली. यासंदर्भात सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'एच३ एन२' ची लक्षणे

'एच३ एन२' लागण झालेल्या रुग्णांमध्ये अशक्तपणा, थकवा, अंगदुखी, सांधेदुखी ताप किंवा श्वास घेताना त्रास होऊ शकतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे आणि त्यांना अशी कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्यांनी त्वरीत तपासणी करून घ्यावी, अन्यथा मोठा धोका उद्भवू शकतो.

विभाग