पाकिस्तान, चीनला धडकी! भारत खरेदी करणार तब्बल दीड लाख कोटींची शस्त्रास्त्र, 'या' शस्त्रांचा समावेश
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तान, चीनला धडकी! भारत खरेदी करणार तब्बल दीड लाख कोटींची शस्त्रास्त्र, 'या' शस्त्रांचा समावेश

पाकिस्तान, चीनला धडकी! भारत खरेदी करणार तब्बल दीड लाख कोटींची शस्त्रास्त्र, 'या' शस्त्रांचा समावेश

Jan 13, 2025 11:28 AM IST

India Mega Defence Deals : आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिटसाठी पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर पुढील महिन्यात जाणार असून या दरम्यान फ्रान्ससोबत अनेक संरक्षण करारांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

पाकिस्तान, चीनला धडकी! भारत खरेदी करणार तब्बल दीड लाख कोटींची शस्त्रास्त्र; लष्कराला मिळणार 'ही' शस्त्र
पाकिस्तान, चीनला धडकी! भारत खरेदी करणार तब्बल दीड लाख कोटींची शस्त्रास्त्र; लष्कराला मिळणार 'ही' शस्त्र (PTI)

India Mega Defence Deals : देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तसेच अंतर्गत आणि बहिर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत येत्या काही महिन्यांत अनेक मोठे शस्त्रास्त्र खरेदी करार करणार आहे. यावर्षी ३१  मार्च रोजी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ४  प्रमुख संरक्षण करारांना अंतिम रूप देण्याची योजना सरकारने आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ताफ्यात आधुनिक लढाऊ विमाने, पाणबुड्या, हेलिकॉप्टर आणि तोफांचा समावेश करण्यासाठी दीड लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे करार केले जाणार आहेत. हे करार सशस्त्र दलांची मारक शक्ती आणि लढाऊ क्षमता वाढवणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने संरक्षण खात्याच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भारत २६ राफेल-मरीन लढाऊ विमानांच्या थेट खरेदीसाठी लवकरच फ्रान्ससोबत सुमारे ६३,००० कोटी रुपयांचा करार करणार आहे. स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर ही विमाने  तैनात करण्यात येणार आहेत. या करारामध्ये नौदलासाठी २२ सिंगल सीट मेरिटाइम जेट आणि चार ट्विन सीट ट्रेनर विमाने खरेदी केली जाणार आहे. तर   पाच वर्षांसाठी शस्त्रास्त्रे, सिम्युलेटर, प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट तसेच हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या ३६ राफेल विमानांसाठी सुटे भाग खरेदी यांचा देखील यात  समावेश आहे. हा करार पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ आणि १२ फेब्रुवारीला फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या काळात फ्रान्ससोबत ३८ हजार कोटी रुपयांचा आणखी एक करार करण्यात येणार आहे. यात तीन अतिरिक्त स्कॉर्पीन डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा समावेश राहणं आहे. या पाणबुड्यांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक्स येथे करण्यात येणार आहे. यातील पहिली पाणबुडी ही नौदलात  २०३१ मध्ये समाविष्ट केली जाणार आहे.  या पाणबुड्या  दीर्घकाळ  पाण्याखाली राहू शकणार आहेत. या साठी यात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) यंत्रणा बसवण्यात येणार आहे.  

भारतीय कंपन्यांना देखील मिळणार कंत्राटे

याशिवाय भारत १५६  स्वदेशी प्रचंड लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्ससाठी सुमारे ५३०००  कोटी रुपये आणि ३०७  स्वदेशी अॅडव्हान्स्ड कॉम्बॅट आर्टिलरी गन सिस्टमसाठी (एटीएजीएस) ८५००  कोटी रुपयांचा करार करणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केलेले नवे  हेलिकॉप्टर सियाचिन ग्लेशियर आणि पूर्व लडाखसारख्या भागांतील आव्हान तोंड देण्यास सक्षम राहणार आहे.  तर डीआरडीओने डिझाइन आणि विकसित केलेल्या एटीएजीएसची मारक क्षमता ४८ किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. या तोफांची बांधणी भारत फोर्ज आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स करणार आहेत.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर