India Pakistan ceasefire: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीसंदर्भात लष्कराकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. हवाई दलाने सांगितले की, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानने केलेल्या कारवाईमुळे आम्हाला प्रत्युत्तर देणे भाग पडले. पाकिस्तानकडून चिनी क्षेपणास्त्रांनी आमच्यावर हल्ला केला, पण ते आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेत घुसण्यात अपयशी ठरले. आमच्या संरक्षण यंत्रणेने हवेतच ही क्षेपणास्त्रे नष्ट केली.
हवाई दलाच्या वतीने माध्यमांशी बोलताना एअर मार्शल भारती म्हणाले की, आम्ही केवळ दहशतवाद्यांवर, त्यांच्या तळांवर अचूक हल्ले केले, पण पाकिस्तानी सैन्याने ते स्वत:वर घेतले. पाकिस्तानी सैन्याशी युद्ध करणे किंवा त्यांच्या तळांना लक्ष्य करणे हा आमचा उद्देश नव्हता. हे यापूर्वीही आमच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानी सैन्याने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण ते आमच्या बहुस्तरीय संरक्षण यंत्रणेत घुसखोरी करण्यात अपयशी ठरले. आमच्या हवाई संरक्षणाने तुर्की आणि चीनचे ड्रोन आणि पाकिस्तानने हवेत पाठवलेले रॉकेट पाडले.
यानंतर आम्ही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले, ज्यात आम्ही पाकिस्तानचे नूर खान एअरबेस उद्ध्वस्त केले आणि अनेक हवाईतळांचे मोठे नुकसान केले, असे एअर मार्शल म्हणाले. आम्ही पाकिस्तानी हवाई तळांची दुरवस्था केली. आमच्या सैन्याने सीमा न ओलांडता आपलं काम केलं. पाकिस्तानचे जे काही नुकसान झाले आहे, त्याला पाकिस्तानी लष्कर जबाबदार आहे. या हल्ल्याच्या माध्यमातून आम्ही जगातील सर्व देशांना आपली ताकद दाखवून दिली आहे. आम्ही पाकिस्तानला स्पष्ट करू इच्छितो की, आम्हाला हवे तेथे, हवे तेव्हा आम्ही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. आमची
एअर मार्शल भारती यांनी म्हटले की, सर्व शस्त्रास्त्रे, आमची लढाऊ विमाने परिपूर्ण स्थितीत आहेत आणि शत्रूचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमची जी काही उद्दिष्टे होती, ती पूर्णपणे साध्य झाली, असे लष्कराने म्हटले होते. त्यानंतर झालेल्या पाकिस्तानी कारवाईला आम्ही चोख प्रत्युत्तर दिले.
संबंधित बातम्या