मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Iran Israel war : जग महायुद्धाच्या छायेत; इराण ४८ तासांत इस्रायलवर करणार हल्ला, भारताकडून नागरिकांना इशारा…

Iran Israel war : जग महायुद्धाच्या छायेत; इराण ४८ तासांत इस्रायलवर करणार हल्ला, भारताकडून नागरिकांना इशारा…

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 12, 2024 09:19 PM IST

Iran Israel War News : इराण पुढच्या ४८ तासांत इस्त्रालयवर (Iran Israel War) मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने या दोन्ही देशात प्रवास न करण्याची सूचना दिली आहे.

इराण ४८ तासांत इस्रायलवर करणार हल्ला
इराण ४८ तासांत इस्रायलवर करणार हल्ला

भारत सरकारने शुक्रवारी आपल्या नागरिकांना इराण व इस्त्रायलकडे (Iran Israel war) प्रवास न करण्याची सूचना दिली आहे. सीरियामध्ये ११ दिवसापूर्वी इराणच्या दूतावासावर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून नागरिकांना इशारा दिला आहे. या हल्ल्यासाठी इराणने इस्त्रायलला जबाबदार धरले आहे. त्यामुळे इराण लवकरच इस्त्रायलवर मोठा हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराण व इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी सूचना दिली आहे की, त्यांनी आपल्या सुरक्षेविषयी सतर्क रहावे.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले (India on issued travel advisory Indians) आहे की,जे नागरिक इराण व इस्त्रायल या दोन्ही देशात राहत आहेत, त्यांनी तत्काळ त्या देशातील भारतीय दुतावासाशी संपर्क करून आपली नोंदणी करावी.

दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर मोठा हल्ला करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.इराण आणि इस्रायलमधील संघर्ष नवा नाही.इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष पेटल्यानंतर इराण युद्धात उतरणार,अशी चर्चा होती. मात्र ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात इराण उतरला नव्हता. मात्र आता त्यांच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी इस्रायलवर थेट हल्ला करण्याची तयारी केली आहे.

इराणच्या एका इमारतीवर झालेल्या हल्ल्यानंतर इराण जोरदार पलटवार करण्याच्या तयारीत आहे. यामुळे मध्य पूर्वमध्ये तणावाचे वातावरण आहे. इराणने बदला घेण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी इस्त्रायलना समर्थन देण्याची घोषणा केली आहे. एक एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यासाठी इस्त्रायलला जबाबदार धरले जात आहे.

ओवैसींचा केंद्र सरकारवर निशाणा -

परराष्ट्र मंत्रालयाच्या एडव्हायजरीनंतर भारतात यावरून राजकारण सुरू झाले आहे. एआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म'एक्स' वर लिहिले की,'मोदी सरकारने एडवायजरी जारी करत भारतीयांना इस्त्रालयला न जाण्यास सांगितले आहे. मग भारत सरकार भारतीय नागरिकांना इस्त्रायलला का पाठवत आहे. जर तो देश सुरक्षित नसेल तर भारतीयांना मृत्यूच्या दाढेत का ढकलले जात आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार का? इस्त्रायल मोठा नरसंहार करू शकतो त्याला गरीब भारतीयांची पर्वा नाही. भारतीय कामगारांची निर्यात थांबवली पाहिजे तसेच आधीपासून जे आहेत, त्यांना परत आणले पाहिजे.

IPL_Entry_Point