indian navy strategic base : भारत विरोधी मुइज्जूला भारताचं चोख उत्तर! मालदीवजवळच उभारणार नौदलाचा तळ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  indian navy strategic base : भारत विरोधी मुइज्जूला भारताचं चोख उत्तर! मालदीवजवळच उभारणार नौदलाचा तळ

indian navy strategic base : भारत विरोधी मुइज्जूला भारताचं चोख उत्तर! मालदीवजवळच उभारणार नौदलाचा तळ

Mar 04, 2024 06:51 AM IST

indian navy strategic base near maldives : भारतीय नौदलाचा (Indian Navy) लक्षद्वीपमध्ये (lakshadweep) नवीन तळ उभारण्यात आल्याने या भागात भारताची पाळत वाढणार आहे. नवीन तळ मालदीवपासून सुमारे २५८ किलोमीटर (१६० मैल) अंतरावर आहे.

भारत विरोधी मुइज्जूला भारताचं चोख उत्तर! मालदीवजवळच उभारणार नौदलाचा तळ
भारत विरोधी मुइज्जूला भारताचं चोख उत्तर! मालदीवजवळच उभारणार नौदलाचा तळ

indian navy strategic base near maldives : भारत मालदीवजवळील लक्षद्वीपमधील मिनीकोय येथे नौदल तळ उभारणार आहे. या तळाचे काम पूर्ण झाले असून लवकरच तो सुरू केला जाणार आहे. या तळामुळे मालदिवला मोठी चपराक बसणार आहे. भारताच्या या चालीमुळे हिंदी महासागरात भारताचा दबदबा वाढणार आहे. मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू यांचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतासोबतचे संबंध ताणले आहे. राष्ट्राध्यक्ष होताच मुइझ्झू यांनी चीनशी जवळीक साधली असून चीनला खूश करण्यासाठी भारतीय सैन्याला आपल्या देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. या घोषणेनंतर भारत आणि मालदिव या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. आता भारत या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात नौदल तळ सुरू करणार आहे, हे पाऊल मालदीवला नक्कीच डिचवणारे आहे.

Earthquake in Nanded : नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये घबराट, रिश्टर स्केलवर इतकी नोंद

हिंद महासागरात भारताचा वाढणार दबदबा

भारतीय नौदलाने शनिवारी रात्री उशिरा एका निवेदनात म्हटले आहे की मालदीवमध्ये चीनच्या वाढत्या उपस्थितीबद्दल भारत संशयास्पद आहे. नौदलाच्या म्हणण्यानुसार, या नव्या तळामुळे या भागात भारताची देखरेख वाढणार आहे. भारताच्या लक्षद्वीप बेटांवर ६ मार्च रोजी उघडण्यासाठी नियोजित असलेला नवीन तळ सध्याच्या लहान तुकडीला स्वतंत्र नौदल युनिटमध्ये रूपांतरित करेल, असे नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे.

भारताचे लक्षद्वीप मालदीवच्या उत्तरेस सुमारे १३० किलोमीटर (८० ल) अंतरावर आहे, हे उल्लेखनीय आहे. जेथे मिनिकोय बेटावर नवीन नौदल तळ बांधला जाणार आहे, तो मालदीव पासून जवळच्या ठिकाणी आहे. लक्षद्वीपच्या कावरत्ती बेटावर भारतीय नौदलाचा आधीच तळ आहे. परंतु नवीन तळ मालदीवपासून सुमारे २५८ किलोमीटर (१६० मैल) अंतरावर आहे.

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’च्या तिसऱ्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण, आता मुंबई ते शिर्डी प्रवास होणार वेगवान!

चाचेगिरीवर केली जाणार कडक कारवाई

"मिनीकोय हे लक्षद्वीपच्या दक्षिणेकडील बेट आहे. हे बेट हिंद महासागरातील दळणवळणाच्या महत्त्वाच्या मार्गांना जोडते," असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाने सांगितले की, या तळामुळे चाचेगिरी आणि अंमली पदार्थविरोधी कारवाया अधिक वेगाने करता येणार आहे. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या बेटांवर सुरक्षा पायाभूत सुविधा निर्माण करेल.

भारताने अंतिम मुदतीपूर्वी माघारी बोलावले सैन्य

मालदिवला मदत करण्याच्या हेतूने भारताने हेलिकॉप्टर आणि विमाने दिली आहे. या साठि भारतीय लष्कराचे जवान मालदिवला होते. दरम्यान, आता हे सैन्य माघारी बोलावले जाणार आहे. दरम्यान, त्यांच्या बदल्यात तांत्रिक तज्ञांची भारताची पहिली नागरी टीम मालदीवमध्ये पोहोचली आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या देशातून भारतीय लष्करी जवानांच्या पहिल्या गटाला परतण्यासाठी १० मार्च ही अंतिम मुदत दिली होती. "प्रगत हलके हेलिकॉप्टर चालवणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची पहिली टीम मालदीवमध्ये दाखल झाली आहे. हे हेलिकॉप्टर चालवणाऱ्या सध्याच्या कर्मचाऱ्यांची जागा घेईल," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर