मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Weather Updates: कुठे थंडी तर कुठे पावसाच्या सरी कोसळणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

Weather Updates: कुठे थंडी तर कुठे पावसाच्या सरी कोसळणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 08, 2023 10:25 AM IST

IMD Weather Updates: हवामान खात्याने देशातील कोणकोणत्या राज्यांमध्ये पावसांना अंदाज वर्तवला आहे, जाणून घ्या.

weather update
weather update

India Meteorological Department Weather Updates: देशात पुन्हा एकदा हवामानाचे स्वरूप बदलत आहे. एकीकडे डोंगरात बर्फवृष्टी होत आहे तर दुसरीकडे मैदानी भागात थंडीची तीव्रता वाढत आहे. थंडीसोबतच दिल्ली एनसीआरवरही प्रदूषणाचा परिणाम होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये तापमानात घट होणार आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे, त्याचा परिणाम मैदानी भागात दिसून येतो. थंड वाऱ्यांमुळे वातावरण आल्हाददायक झाले असून दिल्ली एनसीआर, यूपी, पंजाब आणि हरियाणामध्ये थंडी वाढताना दिसत आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले चक्रीवादळ मिचॉन्ग आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळले. या चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जाणवेल, जिथे हलक्या पावसाची शक्यता आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, अंदमान आणि काही ठिकाणी हलका ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर दिल्ली एनसीआरच्या हवामानात फारसा बदल झालेला नाही. मात्र तरीही दिल्लीकरांनी थंडीचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. येत्या १५ डिसेंबरनंतर थंडी अचानक वाढेल आणि किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

WhatsApp channel