मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India Maldives Tension: १५ मार्चपर्यंत सैनिकांना माघारी बोलवा; मालदीवचा भारताला अल्टिमेटम

India Maldives Tension: १५ मार्चपर्यंत सैनिकांना माघारी बोलवा; मालदीवचा भारताला अल्टिमेटम

Jan 15, 2024 10:04 AM IST

India Maldives row : मालदिव आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस तणावपूर्ण होऊ लागले आहे. मालदीवच्या राष्ट्रपतींच्या प्रधान सचिवांनी भारताला १५ मार्च पर्यंत सैन्य मागे घेण्याचे सांगितले आहे.

Maldives Vs India
Maldives Vs India

India Malddives row : मालदीव आणि भारत यांचे संबंध दिवसेंदिवस अधिकच ताणले जात आहेत. हा वाद थांबण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत नाही. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीन दौऱ्याहून परत येताच भारताला गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर आता १५ मार्च पर्यंत भारतीय सैन्य माघारी घेण्याबाबत अल्टीमेटम त्यांनी दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra weather update : राज्यात थंडी उष्णतेचा खेळ! तर उत्तर भारतात शीतलहर, तापमानात घट होण्याची शक्यता

भारत आणि मालदिव यांच्यातील वाद वाढत आहे. काही वर्षांपासून भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या विनंतीवरुन ही तुकडी तेथे तैनात करण्यात आली होती. भारतीय लष्कराची ही तुकडी मालदीवच्या लष्कराला सागरी सुरक्षा तसेच आपत्ती निवारण कार्यात मदत करते, मात्र, आता मुइझ्झूच्या सरकारने भारतीय लष्कराच्या तुकडीला १५ मार्चपर्यंत मालदीव सोडण्याचे आदेश दिले आहेत.

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे हृदयविकारामुळे निधन! लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, मालदिवच्या या भूमिकेवर भारताने देखील प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या विषयावर चर्चा करतील. नुकतीच माले येथे दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पहिली बैठक झाली. यावेळी अध्यक्ष मुइझू यांनी ही मागणी केली. मालदीवच्या राष्ट्रपतींचे प्रधान सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी माले येथे या बाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, "मुइझ्झू यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या मालदीवच्या शिष्टमंडळाला भारतीय अधिकाऱ्यांना मार्चच्या मध्यापर्यंत सैन्य मागे घेण्यास सांगितले.

इब्राहिम यांनी सांगितले की, भारतीय सैन्याच्या माघारीवर चर्चा करणारी ही १२ वी बैठक आहे आणि दोन्ही देशांमधील संबंधांना धोका न पोहोचवता सुसंस्कृत आणि मुत्सद्दी पद्धतीने भारतीय सैन्य माघारी घेतले जाईल. भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये राहू शकत नाहीत. हे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि या प्रशासनाचे धोरण आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालदीवमधील लोकांना मानवतावादी आणि वैद्यकीय मदत करणाऱ्या संघटनांचे काम सुरू राहील.

मालदीवमध्ये भारतीय लष्कराचे 88 सैनिक उपस्थित आहेत. मुइज्जू सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले होते, परंतु आता त्यांनी यासाठी मुदतही निश्चित केली आहे.

मालदीवमध्ये सुमारे ८८ भारतीय लष्करी कर्मचारी आहेत. हे सैन्य भारताने मालदिवला भेट म्हणून दिलेले हेलिकॉप्टर आणि एक विमान चालवत त्या ठिकाणी मानवतावादी मोहिमा राबवतात.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले आहेत. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यावर त्यात आणखी भर पडली आहे. मालदीव सरकारने तिन्ही मंत्र्यांना निलंबित करून वाद कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी, हा वाद वाढत असल्याचेच चित्र आहे. दरम्यान, मालदिवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांचे सुर पालटले आहेत. त्यांनी भारताला धमकी वजा इशारा दिला आहे. मुइजू म्हणले, 'आम्ही लहान असू, पण आम्हाला धमकावण्याचा परवाना मिळत(भारत) नाही, असे त्यांनी भारताचे नाव न घेता म्हटले आहे.

WhatsApp channel
विभाग