पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध बिघडले आहे. आता भारताचा मित्र इस्रायलने मालदीवला आरसा दाखवत लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्याची मुक्तकंठाने प्रसंशा केली आहे. त्याचबरोबर लक्षद्वीपबाबत मोठी घोषणा केली आहे. इस्रायलने म्हटले आहे की,भारताच्या या केंद्र शासित प्रदेशात उद्यापासून समुद्राचे पाणी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू करणार आहे.
भारतातील इस्रायलच्या राजदुतांनी आपल्या एक्स हँडलवर लक्षद्वीपचे काही फोटो शेर केले आहेत. त्याचबरोबर लिहिले आहे की, 'डिसेलिनेशन प्रोजेक्ट सुरू करण्याच्या भारताच्या आवाहनानंतर आम्ही मागील वर्षी लक्षद्वीपला गेलो होता.इस्रायल उद्यापासूनच या प्रकल्पावर काम करण्यास तयार आहे. हे फोटो अशा लोकांसाठी आहेत, जे अजूनपर्यंत लक्षद्वीपचे सौंदर्य पाहू शकले नाहीत. या फोटोंमध्ये या द्वीपच्या मनमोहक आणि आकर्षक दृष्ये पाहू शकता.
लक्षद्वीप एक बेट आहे. तेथे पिण्यासाठी गोड्या पाण्याचा अभाव आहे. इस्रायलकडे समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्यात बदलण्याचे तंत्रज्ञान आहे. त्याला डिसेलिनेशन म्हणतात. याच्या माध्यमातून खाऱ्या पाण्यात असलेले खनिजे व अन्य अशुद्ध घटक वेगळे करून पाणी पिण्यायोग्य केले जाते. इस्रायलही समुद्राने वेढलेला आहे. त्याचबरोबर तेथील जमीन वाळवंटी आहे. त्यामुळे तेथे पाण्याची कमतरता आहे. मात्र समुद्राचे खारे पाणी डिसेलिनेशन तंत्रज्ञानाने गोड्या पाण्यात बदलून आपली गरज भागवतो. लक्षद्वीपमध्ये पर्यटनास प्रोत्साहन देण्याच्या दिशेने डिसेलिनेशन खूप महत्वपूर्ण ठरू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी अलीकडेच लक्षद्वीपचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भारतीयांना लक्षद्वीपला येण्याचे आवाहन केले. यानंतर मालदीव सरकारचे मंत्री मरियम शुआन यांनी सोशल एक्सवर पंतप्रधान मोदींबाबत अपमानास्पद शब्द वापरले. शुआनाच्या या अश्लील टिप्पणीचा भारतीयांनी जोरदार विरोध केला. यानंतर सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड होत आहे.