रस्ते निर्मितीत भारताने जगातील अनेक विकसित देशांना मागे टाकत नवा विश्वविक्रम केला आहे. जे काम अमेरिका, चीन व जपानला जमले नाही, तो कारनामा भारताने केला आहे. भारतात १०० किलोमीटरचा रस्ता १०० तासांत तयार झाला आहे. गाझियाबाद-अलिगढ द्रुतगती मार्गादरम्यान NH ३४ वर १५ मे रोजी सकाळी १० वाजता या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली,जी १९ मे रोजी दुपारी २ वाजता म्हणजे १०० तासांत ११२ किमी महामार्ग बांधूनपूर्ण झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून या टीमचे अभिनंदन केले आहे.
देशातील अग्रगण्य कंपनी लार्सन अँड टुब्रो ग्रुपने केवळ १०० तासात हा १०० किलोमीटरचा भव्य रस्ता बनवला आहे.
या कामासाठी २००० कर्मचारी २४ तास कामाला लागले होते. १०० तासात १०० किमीचा रस्ता तयार करून लार्सन अँड टुब्रोने जुना विक्रम मोडला आहे.
विश्वविक्रमाला गवसणी घालणारा हा रस्ता गाझियाबाद ते बुलंदशहर अलीगढ येथे तयार करण्यात आला आहे. लार्सन अँड टर्बोच्या यशाबद्दल बुलंदशहर येथील एका रिसॉर्टमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टीमचे अभिनंदन केले आहे.