आत्मनिर्भर भारतच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल, INS विक्रांतवर LCA लढाऊ विमानाचे यशस्वी लँडिंग, पाहा VIDEO
LCA lands on INS Vikrant : सुरक्षेच्या दृष्टीने भारताने आणखी एक पाऊल टाकले असून आता विक्रांत युद्धनौकेवरून हलक्या लढाऊ विमानाचे यशस्वी उड्डाण व लँडिंग पार पडले.
भारतीय नौदलाने सोमवारी 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड पार केला. नौदलाच्या वैमानिकांनी भारतात निर्मित एअरक्राफ्ट कॅरियर आयएनएस विक्रांत जहाजावर स्वदेशी व वजनाने हल्के लडाऊ विमान'एलसीए नेवी' चे यशस्वी लँडिंग केले. स्वदेशात निर्मित लडाऊ विमान आणि विमान वाहक जहाजाचे डिझाइन विकसित करून भारताने आपली युद्ध क्षमता आणखी मजबूत केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आयएनएस विक्रांतचे निर्माण केरळमध्ये भारतीय नौदलाच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीत करण्यात आले आहे. हल्के लडाऊ विमान'एलसीए नेवी' ला हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने निर्माण केले आहे. या एअरक्राफ्ट कॅरियरचे पंतप्रधान मोदींनी २ सप्टेंबर २०२२ रोजी लोकार्पण केले होते. नौसेनेच्या या युद्धनौकेला समुद्रावर चालणारे एक एअरफोर्स स्टेशन म्हटले जाते. आयएनएस विक्रांत देशाच्या आत्मनिर्भरतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. या विमानवाहू युद्धनौकेवर १६०० क्रू मेंबर तैनात आहेत. या युद्धनौकेचे डिजाइन वारशिप डिझाइन ब्यूरोने तयार केले आहे. याचे वजन ४५, ०००टन आणि कमाल वेग २८ नॉट आहे. विक्रांतमध्ये जवळपास २,२०० कंपार्टमेंट आहेत.
आयएनएस विक्रांत आणि एलसीएचे डिझाइन करण्यापासून हे विकसित,निर्माण आणि संचालन करण्यापर्यंतचे काम भारतातच झाल्याने भारताचे तंत्रज्ञान व युद्धक्षमता जगाला दिसली आहे. लाइट कॉम्बॅटट एअरक्राफ्टला हवाईदलात'तेजस'नावाने सेवेत आणण्यात आले आहे. युद्धाच्या वेळेस विमान व युद्धनौका आघाडीवर असतात. हे लँडिंग यामुळे विशेष आहे की, कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेवर फायटर प्लेनचे लँडिंग करणे आव्हानात्मक असते. कारण एयरक्राफ्ट कॅरियरचा रनवे खूपच कमी लांबीचा असतो.
देशातील पहिल्या स्वदेशी विमान वाहक'विक्रांत'मधूनसंचालित करण्यासाठी फ्रांसच्या राफेल एम विमानाची निवड केली आहे. भारतीय नौदल २६ राफेल एम विमानांसाठी फ्रांससोबत अब्जावधी डॉलरचा करार करणार आहे. मार्च महिन्यात फ्रांसचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर येणार असून यावेळी करारावर दोन्ही पक्षाकडून हस्ताक्षर होऊ शकतात. भारतीय नौदलाने अमेरिकी जेट एफ/ए-१८ सुपर हॉर्नेटचा करार रद्द करून राफेल एम निवडले आहे. यापूर्वी भारतीय हवाई दलाने दोन लडाऊ स्क्वाड्रन (३६ विमाने) साठी राफेल निवडले होते, आता भारतीय नौसेनेने राफेल एम भारतात आणण्यासाठी तयारी केली आहे.
विभाग